कृषी संजीवनी सप्ताह पवार वाडी येथे उत्साहात संपन्न

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, रहिमतपूर, दि. 7 : कृषी विभागाच्या वतीने कृषी दिनानिमित्त कृषी संजीवनी सप्ताह पवार वाडी येथे मोठ्या उत्साहात उत्साहात संपन्न झाला.

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्य मंत्री कृषी हरीत क्रांतीचे जनक स्व वसंतराव नाईक यांच्या जयंती व कृषी दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत पवार वाडी येथे कृषी संजीवनी सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

कोरेगाव तालुका कृषी अधिकारी सहाय्य क कोरेगाव तालुका कृषी अधिकारी शेळके साहेब जाधवसाहेब यांचे मार्गदर्शनाखाली मगा ग्रा रोह योजनेंतर्गत सलग फळ बाग लागवड योज नेचा  शुभा रंभ पवार वाडीचे उप सरपंच तुकाराम पवार व कृषी पर्यवेक्षक अंकुश इगळे यांच्या शुभहस्ते माजी सरपंच पांडुरंग पवार सर राजेंद्र पवार प्रगती शील शेतकरी वसंत भोसले चंद्र कांत पवार विजय पवार कृष्णा पवार अमोल पवार विठ्ठल पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली प्रगती शील शेतकरी रामचंद्र भिलारे यांनी 100 केशर हापूस आंबा रोपांची लागवड केली कृषी पर्यवेक्षक इगळे यांनी स्व गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेची माहिती दिली

कृषी सहा ययक सुजित शिंदे यांनी विविध प्रकारची माहिती दिली कार्यक्रमाचे नियोजन कृषी सहाय्यक सुरेखा पवार यांनी केले

यावेळी प्रियांका गायकवाड विक्रम घाडगे संदीप डोईफोडे ग्रामस्थ शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते

हे देखील वाचा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
कॉपी करू नका..!