दैनिक स्थैर्य | दि. १५ सप्टेंबर २०२३ | बारामती |
श्रीनगर(जम्मू आणि काश्मीर) येथे झालेल्या ‘इंडियन पिंच्याक सिलॅट फेडरेशन’च्या पंचवार्षिक सभेत महाराष्ट्र राज्याचे किशोर येवले (बारामती तालुका) यांची सलग दुसर्यांदा फेडरेशनच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी व आंतरराष्ट्रीय खेळाडू अनुज सरनाईक यांची सदस्यपदी बहुमताने निवड करण्यात आली, अशी माहिती ऑल पुणे ग्रामीण बारामतीचे सचिव साहेबराव ओहोळ यांनी दिली.
बारामतीमध्ये पिंच्याक सिलाट खेळाचा प्रसार अतिशय वेगाने चालू असून राष्ट्रीय-आंतराष्ट्रीय खेळाडू बारामतीतून किशोर येवले व साहेबराव ओहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली निर्माण होत आहेत. ग्रामीण भागातून नवीन खेळाडू तयार होऊन राज्य व आंतरराष्ट्रीय पातळीवर जातील, असा विश्वास साहेबराव ओहोळ यांनी व्यक्त केला.
श्रीनगर निवडणूक अधिकारी म्हणून अॅड. सुमित शर्मा यांनी काम पाहिले. या सभेस देशभरातील इंडियन पिंच्याक सिलॅट फेडरेशनचे २८ राज्य आणि ८ केंद्रशासित प्रदेशातील ७० सदस्य हजर होते.
या सभेमध्ये खालीलप्रमाणे पदाधिकार्यांची निवड करण्यात आली.
- अध्यक्ष : किशोर येवले – महाराष्ट्र,
- वरिष्ठ उपाध्यक्ष : फिलिया थॉमस – दमण अँड दिव,
- उपाध्यक्ष – विजय कुमार – कर्नाटक, अब्रार शेख – मध्य प्रदेश, अरुण साधू – गुजरात, सचिव – तारिक अहमद झार्गर – जम्मू अँड काश्मीर, सहसचिव नोरेम बोयनो सिंग – मणिपूर, सूरज प्रकाश श्रीवास्तव – उत्तर प्रदेश, महेश बाबू – तामिळनाडू, अभय निवास – मध्य प्रदेश, प्रेम सिंग थापा – ओडिसा, लक्ष्यजित डोले – आसाम, अनुज दत्तगुरू सरनाईक – महाराष्ट्र, अँटनी सेडली ब्रगांझा – गोवा, साझ एस. के. – केरळ, सोनिया – हरियाणा.
बारामतीमध्ये होणार्या आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी सर्व पदाधिकारी जानेवारी २०२४ ला बारामतीमध्ये येणार असल्याचे साहेबराव ओव्हाळ यांनी सांगितले.