तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजयसिंह मोहिते पाटील ज्युनिअर कॉलेज जाधववाडीचे यश


दैनिक स्थैर्य | दि. १५ सप्टेंबर २०२३ | फलटण |
माळशिरस (जि. सोलापूर) येथे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा भरवण्यात आल्या होत्या. या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजयसिंह मोहिते पाटील ज्युनिअर कॉलेज जाधववाडीच्या १९ वर्षे वयोगटातील खेळाडूंनी चुरशीच्या लढतीत श्रीराम ज्युनिअर कॉलेज, पाणीव या संघावर अंतिम स्पर्धेत मात करून प्रथम क्रमांक मिळविला. या यशामुळे त्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

या यशाबद्दल विजयसिंह मोहिते-पाटील ज्युनिअर कॉलेजचे सर्व खेळाडू व क्रीडा शिक्षक, बाजीराव जाधव सर, पालवे मॅडम यांचे मुख्याध्यापक श्री. नाना घार्गे, संस्थाध्यक्ष श्री. शिवाजीराव जाधव, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले व जिल्हास्तरीय स्पर्धेत यश मिळवण्यासाठी शुभेच्छा दिल्या.


Back to top button
Don`t copy text!