अल्पवयीन मुलाचे अपहरण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ३० ऑगस्ट २०२२ । सातारा । नामांकित शाळेत शिकत असलेल्या एका अल्पवयीन मुलाचे अज्ञाताने अपहरण केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 28 ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता सातारा येथील नामांकित शाळेतील विद्यार्थी शिवांशू विजयकुमार शर्मा वय 11, राहणार चित्रामु, जिल्हा कनोज, उत्तर प्रदेश हा त्याच्या मित्रांसोबत सातारा परिसरामध्ये फिरण्यासाठी गेला असता त्याचे कोणीतरी अज्ञात इसमाने अपहरण केले असल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात विरेश वीरेंद्र कुमार वय 45 यांनी नोंदवली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार गायकवाड करीत आहेत.


Back to top button
Don`t copy text!