
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य । दि. ३० ऑगस्ट २०२२ । सातारा । ऑनलाइन सातबारा उताऱ्यावर नाव दुरुस्त करण्यासाठी ४० हजार रुपये लाचेची मागणी करणाऱ्या कराड, ता. कराड येथील तलाठी सागर दत्तात्रय पाटील यांच्या विरोधात कराड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, तक्रारदार व त्यांच्या नातेवाईकांनी खरेदी केलेल्या सर्व्हे नंबर ३४८/३ या प्लॉटवर तक्रार व त्यांच्या नातेवाईकांचे ऑनलाइन सातबारा उताऱ्यावर नाव दुरुस्त करण्यासाठी तलाठी पाटील यांनी त्यांच्याकडे चाळीस हजार रुपयांची लाच मागितली होती. याबाबत तक्रारदार यांनी सातारा येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर त्यात तथ्य आढळल्याने तलाठी सागर दत्तात्रय पाटील याच्यावर कराड शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
