कांतीलाल भोसले यांना महात्मा फुले गौरव पुरस्कार


दैनिक स्थैर्य । 14 मे 2025। फलटण । येथील सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी कांतील भोसले यांना शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल महात्मा फुले गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराचे वितरण जेष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ यांच्या हस्ते करण्यात आले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती महोत्सव व महात्मा फुले यांना बहाल केलेल्या महात्मा पदवी प्रदान समारंभाचे 137 व्या प्रदान दिनाचे औचित्य साधून सृजन फौंडेशन व महात्मा फुले अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने या पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमास ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संपतराव जाधव, साहित्यिक सर्जाकार सुरेश शिंदे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी त्रिशताब्दी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष बापूराव सूळ, सुजन फौंडेशनचे अध्यक्ष अजित जाधव, तुकाराम कोकाटे, नवनाथ कोलवडकर व ग्रामस्थ उपस्थित होते.

कांतीलाल भोसले यांना यापूर्वी तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार व जिल्हा आदर्श शिक्षण विस्तार पुरस्काराने गौरविणेत आले आहे. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी अनेक वर्षे शासनाच्या रोजगार हमी योजना प्रकल्पात जिल्हा तक्रार निवारण प्राधिकारी या पदावर उत्कृष्टरित्या कामकाज केले. या कालावधीत विविध प्रश्नांची सोडवणूक करून सामान्य लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. सध्याही ते गरीब, गरजू व होतकरून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून मदत करण्यास अग्रसेर असतात. या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.


Back to top button
Don`t copy text!