“का र देवा” चित्रपट प्रदर्शित; फलटणमध्ये उस्फुर्त प्रतिसाद


दैनिक स्थैर्य । दि. १६ फेब्रुवारी २०२२ । फलटण । “का र देवा” हा चित्रपट म्हणजे ग्रामीण भागामधील एक आदर्श प्रेम कथा व्यक्त करणारा आहे. सदरील चित्रपट हा महाराष्ट्रामधील सुपर हिट चित्रपट बघितल्यावर प्रेक्षक म्हणत आहेत. चित्रपटाची गाणी प्रदर्शित झाल्यानंतर महाराष्ट्रातील ग्रामीण भागासह शहरी भागातील प्रेक्षकांनी सदरील गाणी हि सुपर हिट ठरवली आहेत. त्यांच्या गाण्यांना उस्फुर्त असा प्रतिसाद मिळाला असून आगामी काळामध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटाला सुद्धा उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. सातारा जिल्ह्यातील फलटण येथे प्रकाशित झालेल्या “का र देवा” हा चित्रपटाला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे.

सातारा जिल्ह्याच्या कोरेगाव तालुक्यामधील वाठार स्टेशनसारख्या छोट्याश्या गावामधून आलेले प्रशांत शिंगटे यांनी “का र देवा” हा मराठी चित्रपट खास मराठी प्रेक्षकांच्यासाठी तयार केलेला आहे. “का र देवा” हा चित्रपट निर्माते प्रशांत शिंगटे व दिग्दर्शक रणजित जाधव यांनी मोठ्या मेहनतीने तयार केला आहे. सदरील चित्रपटामध्ये मराठी चित्रपट सृष्टीमधील मोठी स्टार कास्ट घेण्यात आली असून मयूर लाड, मोनालीसा बागल, नागेश भोसले, अरुण नलावडे, सूरज चव्हाण, किरण जाधव यासारखे अनेक दिग्गज कलाकार हे सदरील चित्रपटामध्ये भूमिका बजावत आहेत. तरी राज्यातील प्रेक्षकांनी चित्रपट बघावा असे मत पंचायत समितीचे सदस्य सचिन रणवरे यांनी यावेळी व्यक्त केले.

फलटण येथे प्रिमियर शोचे आयोजन करण्यात आलेले होते. यावेळी फलटण पंचायत समितीचे सदस्य सचिन रणवरे, निर्माते प्रशांत शिंगटे, रिल्स स्टार व कलाकार सूरज चव्हाण, युवा नेते मोहनराव डांगे, साप्ताहिक लोकजागरचे संपादक रोहित वाकडे, उद्योजक योगेश भानुशाली व अक्षय दळवी यांची प्रमुख उपस्थिती होती.

“का रे देवा” ह्या चित्रपटाचे प्रमोशन हे महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये करण्यात आलेले आहे. तर त्यांच्या प्रमोशनला सुद्धा उस्फुर्त असा प्रतिसाद मिळत आहे. राज्यातील अगदी तळागाळातील व्यक्तीच्या पसंतीस सदरील चित्रपट उतरेल असे मत मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गजांचे आहे. “का रे देवा” ह्या चित्रपटाचे निर्माता व यशस्वी उद्योजक प्रशांत शिंगटे यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन केले जात आहे. तर “का रे देवा” हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुपर डुपर हिट ठरेल, असे मत युवा नेते मोहनराव डांगे यांनी यावेळी व्यक्त केले.


Back to top button
Don`t copy text!