फलटणमध्ये बास्केटबॉल स्पर्धा संपन्न; पुण्याच्या टीमने पटकावला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक


दैनिक स्थैर्य । दि. १६ फेब्रुवारी २०२२ । फलटण । येथे आयोजित बास्केटबॉल स्पर्धेमध्ये पुणे येथील मॅथ्यूज गटाने पहिला क्रमांक पटकावला असून त्यांना एकवीस हजार रोख व चषक वितरित करण्यात आलेले आहे. तर दुसरा क्रमांक कोल्हापूर येथील प्रिन्स युनायटेड संघाने पटकवला असून त्यांना पंधरा हजार रोख व चषक असे वितरित करण्यात आलेले आहे. तृतीय क्रमांक बीड येथील संघाने पटकावला असून त्यांना अकरा हजार रोख व चषक असे वितरित करण्यात आलेले आहे. बक्षीस वितरण समारंभ फलटण पंचायत समितीचे सभापती श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी विजेत्या गटाचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी श्रीमंत विश्वजितराजे यांनी शुभेच्छा दिल्या.

बक्षीस वितरण समारंभाच्या वेळी माजी उपनगराध्यक्ष नितीन भोसले (भैय्या), सद्गुरु पतसंस्थेचे चेअरमन तेजसिंह दिलीप भोसले, सौ. नीलिमा लोंढे – पाटील, सौ. अमृता नाईक निंबाळकर, सौ. सोनाली बेडके, दादासाहेब चोरमले, महेंद्र जाधव, भाऊसो कापसे, शामराव कापसे व विजय लोंढे – पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

सदरील स्पर्धेमध्ये बेस्ट प्लेयर पुणे येथील सिद्धांत शिंदे हा किताब पटकावला. बीड संघातील मिथुन दास यांनी बेस्ट शुटर हा किताब पटकावला आहे. तर बेस्ट प्लेअर ऑफ फायनल मॅच हा किताब कोल्हापूर येथील ओम चोपडे यांनी पटकावला आहे.

माजी नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर व बास्केटबॉलचे आजी माजी खेळाडू यांच्या वतीने मुधोजी क्लब येथे बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते. सदरील स्पर्धेचे उदघाटन फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी बास्केटबॉल खेळाचा वाढलेला प्रतिसाद हा अतिशय स्तुत्य असल्याचे मत आमदार दीपक चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केले.

बास्केटबॉल स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी माजी नगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे, माजी नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर, सौ. प्रगती कापसे, सौ. दीपाली निंबाळकर, सौ. ज्योत्स्ना शिरतोडे, सौ. प्रीतम लोंढे – पाटील, हेमंत रानडे, अमरसिंह खानविलकर, सौ. सारिका चव्हाण, सौ. घाडगे, दादासाहेब चोरमले, सौ. सोनाली बेडके, रामदादा नाईक निंबाळकर, अजिंक्य गायकवाड व बाळासाहेब बाबत यांची प्रमुख उपस्थिती होती.

बास्केटबॉल स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड, माजी नगरसेवक चंद्रकांत शिंदे, श्रीराम कारखान्याचे संचालक महादेव माने, पोलीस उपनिरीक्षक राऊळ, डॉ. प्रश्वनाथ राजवैद्य (डॉ. गुंगा), डॉ. बिचुकले, सौ. नीलिमा लोंढे – पाटील, सौ. सौदामिनी गांधी, सौ. सोनाली बेडके यांची प्रमुख उपस्थिती होती.


Back to top button
Don`t copy text!