शासनाच्या क्वॉलिटी कंट्रोल कृषी विभागाची के. बी. बायो-ऑरगॅनिक कंपनीस भेट

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. १ सप्टेंबर २०२३ | फलटण |
महाराष्ट्र सरकारच्या क्वॉलिटी कंट्रोल, कृषी विभागाचे डायरेक्टर श्री. विकास पाटील सर व त्यांची संपूर्ण टीम यांनी आज फलटण येथील आपल्या के. बी. बायो-ऑरगॅनिक आणि के. बी. स्पोर्ट्स कॅम्पसला भेट दिली.

या भेटीदरम्यान कंपनीचे डायरेक्टर श्री. सचिन यादव सर यांच्यासमवेत त्यांनी कंपनीच्या सर्व युनिट्सची पाहणी केली. यामध्ये सर्व प्रयोगशाळा व त्याअंतर्गत चालणारे काम तसेच संशोधन प्रक्रियेमध्ये कंपनीने केलेल्या प्रगतीचा आढावा त्यांनी घेतला. सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देऊन कृषी उद्योगात परिवर्तनात्मक व शाश्वत बदल घडवून आणण्याच्या कंपनी ध्येयाचे त्यांनी कौतुक केले. तसेच कंपनीच्या संशोधन व विकास विभागाचे कार्य पाहून अतिशय प्रभावित झाल्याची प्रतिक्रिया दिली.

यावेळी कंपनीचे डायरेक्टर श्री. सचिन सर यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला.


Back to top button
Don`t copy text!