फलटण येथील जोशी हॉस्पिटलने रचला इतिहास…

‘फलटण रोबोटिक्स सेंटर’ येथे "विठू रोबो”च्या साथीने १०० गुडघ्यांच्या सांधेरोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. १० डिसेंबर २०२३ | फलटण |

जोशी हॉस्पिटल प्रा. लि. हे फलटण येथे अस्थिरोग उपचारासाठी गेली २३ वर्षे रुग्णसेवेत रुजू आहे. डॉ. प्रसाद जोशी हे येथील प्रमुख अस्थिरोग शल्यचिकित्सक आहेत. आजपर्यंत गेल्या २३ वर्षात त्यांनी हाडांच्या गुंतागुंतीच्या २०००० हून अधिक शस्त्रक्रिया यशस्वी केल्या आहेत, ४००० हून अधिक गुडघ्याच्या आणि खुब्याच्या सांध्यांचे प्रत्यारोपण केले आहे.

२०१२ पासून जर्मनी येथून आणलेले नॅविगेशन तंत्रज्ञान वापरून सांधेरोपण शस्त्रक्रिया करण्यास डॉ. प्रसाद जोशी यांनी सुरूवात केली. २५ मे २०२३ रोजी भारतातील तालुकास्तरीय पाहिले रोबोटिक सेंटर, “फलटण रोबोटिक्स सेंटर” या नावाने जोशी हॉस्पिटल प्रा. लि. येथे सुरू करण्यात आले असून ह्या रोबोचे नामकरण “विठू” असे करण्यात आले आहे, असे डॉ. प्रसाद जोशी यांनी सांगितले.

गेल्या पाच महिन्यात “विठू रोबो” च्या सहायाने जोशी हॉस्पिटल प्रा. लि. येथे १०० गुडघ्याच्या सांधेरोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या नुकत्याच पार पाडण्यात आल्या. रोबोटिक्सचे तंत्रज्ञान भारतातील काही शहरातच उपलब्ध आहे. तालुकास्तरीय हे भारतातील पहिलेच रोबोटिक सेंटर असून या तंत्रज्ञानाचा फायदा गावाकडील गुडघेदुखीनी जर्जर झालेल्या पेशंट्सना रास्त दरात मिळतो आहे.

Robotic तंत्रज्ञानाचे फायदे असे आहेत : –

सांध्यात येणारी अधिक अचूकता.
ऑपरेशननंतर होणारी फास्ट recovery .
ऑपरेशनच्या वेळेस होणारा खूप कमी रक्तस्त्राव.
ऑपरेशननंतर होणारे वेदनांचे खूप कमी प्रमाण.
-Patient दुसर्‍या दिवशी आपल्या स्वतःच्या पायांवर उभे राहून वॉकरच्या सहाय्याने चालायला लागतो.

या सर्वांचा एकत्र फायदा असा की, पेशंट दुखःविरहित होऊन लवकर घरी जातो.

सध्या जोशी हॉस्पिटल प्रा. लि. येथे सांधेरोपणासाठी सातारा, पुणे, मुंबई, नागपूर, लातूर, नांदेड, कोल्हापूर, सांगली, पंढरपूर, सोलापूर, रत्नागिरी, लांजा, गोवा, बेळगांव, रामदुर्ग आणि बंगळूरहून रिींळशपीीं येत आहेत. नुकतेच काशी गया, वाराणसी आणि अमेरिकेतून काही पेशंटस्नी आपले सांधे बदलून घेतले आहेत.

भारतात तालुकास्तरीय ठिकाणी एकाच हॉस्पिटलमध्ये एकाच सर्जननी सर्वात जास्त सांधेरोपण शस्त्रक्रिया केल्यामुळे २०१७ साली डॉ. प्रसाद जोशी यांना ‘ INDIAN ACHIEVERS AWARD ‘ ने आणि २०१८ साली ” BHARAT GAURAV AWARD ” ने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच ” Excellence in Orthopedics ” हा किताब २०१९ मध्ये त्यांना मिळाला आहे.

इथून पुढच्या काळात रोबोटिक आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून सांधेरोपणामध्ये क्रांती होईल आणि त्याचा फायदा रास्त दरात गावाकडील पेशंट्सना करून देण्याचा विश्वास डॉ. प्रसाद जोशी यांनी आवर्जून नमूद केला.


Back to top button
Don`t copy text!