जनसेवा डायग्नोस्टिक सेंटरच्या वर्धापनदिनानिमित्त २६ मार्चला घरकाम करणार्‍या महिला सेविकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर


दैनिक स्थैर्य | दि. १९ मार्च २०२३ | फलटण |
मॅग व माऊली फाऊंडेशन संचलित जनसेवा डायग्नोस्टिक सेंटरला २७ मार्च २०२३ रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमिताने जनसेवेचा वर्धापन दिन साजरा होत आहे. वर्धापन दिनाचे औचित्य साधून रविवार, दि. २६ मार्च २०२३ रोजी जनसेवा डायग्नोस्टिक सेंटर मार्फत फलटण शहरामध्ये घरकाम करणार्‍या महिला सेविकांची मोफत आरोग्य तपासणी करून त्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

सदर घरकाम करणार्‍या महिला सेवकांनी जनसेवा लॅबमध्ये मोफत आरोग्य तपासणीसाठी शुक्रवार, दि. २४ मार्च रोजी सायं. ५.०० वाजेपर्यंत खाली दिलेल्या नंबरवर नावनोंदणी करावी. तसेच ज्या घरांमध्ये घरकाम करणार्‍या महिला सेविका काम करतात त्या नागरिकांनी अशा सेवकांची नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ज्यांची नोंदणी झाली आहे अशा महिला सेविकांनी रक्त तपासणीला येण्यापूर्वी १२ तास अगोदर काही खाऊ नये, आदल्या रात्री ८.०० वाजण्याच्या आत हलके जेवण करावे. चहा-कॉफी पिऊ नये, पाणी प्यावे.

नोंदणी केलेल्या घरकाम करणार्‍या महिला सेविकांनी रविवार, दि. २६ मार्च रोजी ७.३० ते १०.०० पर्यंत जेवणापूर्वीच्या रक्त तपासणीसाठी खालील पत्त्यावर यावे. तसेच सकाळी ११.०० ते २.०० वाजेपर्यंत जेवणानंतरच्या रक्ततपासणीसाठी यावे. जेवणानंतरच्या तपासणीसाठी जेवणानंतर बरोबर दीड तासाने रक्त तपासणीस यावे.
त्यानंतर संबंधित महिलांना दुपारी ३.०० ते ५.०० वेळेत तज्ञ डॉक्टरांमार्फत रक्त तपासणी रिपोर्ट पाहून आवश्यक ते मार्गदर्शन मिळेल.

घरकाम करणार्‍या महिलांनी जनसेवा डायनोस्टिक सेंटर, दुसरा मजला, स्वरा हाईट, आर्यमन हॉटेल समोर, डी.एड् चौक, रिंग रोड फलटण येथे किंवा जनसेवा लॅब – मोबा. ९५२९२३३०६७, डॉ. अतुल दोशी – ९७६७४ ६९९९८, निता दोशी – ९४२०९९९९१७, संजीवनी भोईटे :-९७६७४७२७००, सरोज करवा : -९९७५३७८६३१, मनीषा घडिया-७०२०४६७६८२, पद्मा टाळकुटे ९९२३७०८७६३, श्री. तात्या गायकवाड ८६००३९२४४४, श्री. प्रशांत धनावडे -९८९००४३६००, श्री. राहुल कर्णे -९८८१८१२५२० यांच्याशी संपर्क साधावा.

घरकाम करणार्‍या महिला सेविका सोशल मीडियावर नाहीत. कृपया आपल्याकडे काम काम करणार्‍या महिलांना मोफत आरोग्य शिबिरांची माहिती देऊन त्यांना नोंदणी करण्यास सांगा अथवा आपण करा. याबाबतचा मेसेज आपल्या ग्रुपमध्ये टाका व या सामाजिक कार्यास हातभार लावा, असे आवाहन जनसेवा डायग्नोस्टिक सेंटरतर्फे करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!