कामगार संघटना कृती समितीच्या वतीने जनजागरण यात्रेचे होणार स्वागत

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २८ नोव्हेंबर २०२३ | बारामती |
राज्यव्यापी महासंघर्ष जनजागरण यात्रा बारामतीमध्ये १ डिसेंबरला एमआयडीसी परिसरामध्ये येत आहे. त्यानिमित्त बारामती तालुका कामगार संघटना कृती समितीच्या वतीने तिचे स्वागत व जाहीर सभेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे बारामती तालुका कामगार संघटना कृती समितीच्या वतीने जाहीर करण्यात आले.

याप्रसंगी अध्यक्ष नानासाहेब थोरात, उपाध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष तानाजी खराडे, सरचिटणीस गुरुदेव सरोदे, खजिनदार रंजीत भोसले, सहसरचिटणीस रमेश बाबर, सहखजिनदार मधुकर सावंत, सदस्य अजित भांडवलकर, श्रीकांत कदम, आशाबा शेख आदी सदस्य व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस महाराष्ट्र राज्य कौन्सिल यांच्या वतीने राज्यव्यापी महा संघर्ष जनजागर यात्रा २७ नोव्हेंबर ते १८ डिसेंबरपर्यंत होणार असून कोल्हापूर ते नागपूरपर्यंत हा प्रवास होणार आहे.

या दरम्यान बारामतीमध्ये तिचे स्वागत करण्यात येणार असून पेन्सिल चौक येथे दुपारी ४ वाजता भव्य सभेचे सुद्धा नियोजन करण्यात आले आहे. संविधानाच्या संरक्षणासाठी, कामगार, शेतकरी, मजूर, बेरोजगर, महिलांच्या न्याय हक्कासाठी व विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आदी विषयावर सदर जनजागरण संघर्ष यात्रा आहे.

यावेळी बारामती, इंदापूर, कुरकुंभ, जेजुरी, फलटण आदी एमआयडीसीमधील कामगार, मजूर, विद्यार्थी, शेतकरी, महिला यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन बारामती तालुका कामगार संघटना कृती समिती यांच्या वतीने करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!