रोहित पवारांच्या पीएच्या मुलीचा रहस्यमयी मृत्यू; बारामतीत खळबळ

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. २३ ऑगस्ट २०२६ | बारामती |
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांचे पीए अजित दशावतारे यांच्या पीए यांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. अजित दशावतारे यांच्या मुलीची हत्या झाली की आत्महत्या ही मात्र स्पष्ट झाले नाही. बारामतीतील रुई येथील साई गणेश नगर येथे त्या ठिकाणी फॉरेन्सिक टीम दाखल झाली आहे. पुढील तपास सुरू आहे.

आमदार रोहित पवार यांचे पीए यांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. रात्री आईचं आणि मुलीचं किरकोळ भांडण झालं, त्यानंतर मुलगी घरातून निघून गेली. मुलगी मिसिंग असल्याची तक्रार पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आली. मात्र सकाळी घराजवळ तिचा मृतदेह आढळला आहे. बारामतीतील रुई येथील साई गणेश नगर येथे त्या ठिकाणी फॉरेन्सिक टीम दाखल झाली आहे. पुढील तपास सुरू आहे. १२ वर्षांची मुलगी आहे, अशी माहिती समोर आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांचे पीए अजित दशावतारे यांच्या १२ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. मुलीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. प्राथमिक माहितीनुसार, रात्री आई आणि मुलीमध्ये किरकोळ वाद झाला होता. त्यानंतर मुलगी घरातून निघून गेली. मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली होती. मात्र, सकाळी घराजवळ तिचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच बारामतीतील रुई येथील साई गणेश नगर परिसरात फॉरेन्सिक टीम दाखल झाली असून घटनास्थळाची पाहणी आणि पुरावे संकलित करण्याचे काम सुरू आहे. मुलीचा मृत्यू हत्या की अन्य कारणामुळे झाला, हे तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!