कोळकी मंडलात दुष्काळ घोषित करण्यासाठी तहसीलदारांना निवेदन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २८ नोव्हेंबर २०२३ | फलटण |
फलटण तालुक्यातील कोळकी मंडलात (सर्कल) प्रशासनाकडून दुष्काळ घोषित करण्यासाठी मंगळवारी या मंडलातील सर्व गावातील शेतकर्‍यांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात शेतकर्‍यांनी म्हटले आहे की, फलटण तालुयातील नव्याने निर्माण झालेल्या कोळकी मंडलामध्ये कोळकी, फरांदवाडी, ठाकुरकी, जाधववाडी, झिरपवाडी, सासकल, भाडळी खु॥, भाडळी बु., दुधेबावी, तिरकवाडी, वडले, सोनवडी खु॥, सोनवडी बु. अशा १३ गावांचा समावेश आहे. शासनाकडून फलटण तालुक्यातील कोळकी व्यतिरित इतर मंडलांचा समावेश दुष्काळ यादीत असून, कोळकी मंडलाचा समावेश यामध्ये नसल्याने यातील १३ गावांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.

दरम्यान, शासनाची कोणतीही मदत दुष्काळ घोषित न झाल्यामुळे कोळकी मंडलातील गावांना होणार नाही. तरी शासनाच्या वतीने कोळकी मंडलाचा समावेश दुष्काळ यादीत करण्यासाठी आपण प्रयत्न करावा, अशी विनंती शेतकर्‍यांनी फलटणचे तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांना केली आहे.

या निवेदनावर श्री. सचिन कुंडलिक रणवरे, अ‍ॅड. अक्षय हणमंतराव सोनवलकर, श्री. महादेव शिवराम गुंजवटे, श्री. विकास नाळे, श्री. रणजित मल्हारी सोनवलकर ह्या या मंडलातील शेतकर्‍यांच्या सह्या आहेत.


Back to top button
Don`t copy text!