दिल्लीत आयएसआयच्या दहशतवाद्याला अटक


 

स्थैर्य, नवी दिल्ली, दि. २२ : दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या हाती मोठे यश आले आहे. आयएसआयच्या एका दहशतवाद्याला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केली असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच्याकडून दोन प्रेशर कूकर, आयईडीसह काही हत्यारे आणि काही महत्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलचे पोलिस उपायुक्त प्रमोद सिंह कुशवाहा यांनी सांगितले की, काल रात्री धौला कुआं परिसरात झालेल्या चकमकीत आयईडीसह एका आयएसआयच्या दहशतवाद्याला अटक केली आहे.

अटक करण्यापूर्वी रात्री11.12 वाजता दिल्लीच्या पोलिस आर्मा स्कूलजवळ पोलीस आणि दहशतवाद्यामध्ये चकमक उडाली. पोलिसांनी धडक कारवाई करत दहशतवाद्याला बेड्या ठोकल्या. या दहशतवाद्याचे नाव मोहम्मद युसुफ असे आहे. त्याच्याजवळून आयईडी स्फोटकांसह मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. घटनास्थळावरून दोन अतिरेकी फरार झाले असल्याची माहिती आहे.

राजधानी दिल्लीत आधीपासून अलर्ट जारी केलेला आहे. गुप्तचर एजेंसीला तीन दहशतवादी भारतात घुसल्याची माहिती मिळाली होती. हे दहशतवादी कोणत्यातरी व्हिआयपीला निशाणा बनवणार होते आणि मोठा बॉम्बस्फोट करणार होते. त्या व्हिआयपी व्यक्तीचे नाव अजून समोर आलेले नाही. दिल्ली पोलिस आता पकडलेल्या दहशतवाद्याची चौकशी करत आहेत. दिल्ली पोलिसांनी सांगितले आहे की, जर फरार झालेल्या दहशतवाद्याला पकडले गेले नाही तर भविष्यात धोक्‍याची घंटा आहे. यामुळे दिल्ली पोलिसांच्या सहा टीम त्यांच्या शोधात आहेत. या टीमने वेगवेगळ्या ठिकाणी रेड टाकायला सुरुवात केली आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!