इंटर्नशालाची मुलींकरिता स्कॉलरशिप

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०६ जानेवारी २०२३ । मुंबई । इंटर्नशाला या करिअर-टेक व्यासपीठाने त्यांची वार्षिक स्कॉलरशिप ‘इंटर्नशाला करिअर स्कॉलरशिप फॉर गर्ल्स (आयसीएसजी) – २०२३’ची घोषणा केली आहे. आयसीएसजी हा २५,००० रूपयांचा वार्षिक पुरस्कार आहे, जो शिक्षण, क्रीडा, कला किंवा इतर कोणत्याही क्षेत्रांमध्ये आपले स्वप्नवत करिअर पूर्ण करण्यासाठी विषम परिस्थितींचा सामना केलेल्या मुलींना सन्मानित करतो. ही स्कॉलरशिप इंटर्नशिप करण्यासाठी किंवा निवडलेल्या क्षेत्रामध्ये प्रकल्प हाती घेण्यासाठी, विशेष प्रशिक्षण उपक्रमाप्रती पेमेंटसाठी, स्पेशल उपकरणासाठी भत्ता म्हणून देण्यात येईल.

आयसीएसजी स्कॉलरशिपकरिता पात्र ठरण्यासाठी अर्जदार मुली भारताच्या नागरिक असण्यासोबत १७ ते २३ वर्षे वयोगटातील (३१ डिसेंबर २०२२ पर्यंत) असणे आवश्यक आहे, तसेच त्यांनी १५ जानेवारी २०२३ पर्यंत अर्ज भरणे आवश्यक आहे. विषम स्थितींविरूद्ध लढा, उपलब्‍धी, उद्देश व गरज या चार घटकांच्या आधारावर अर्ज शॉर्टलिस्ट केले जातील. स्कॉलरशिपकरिता अर्ज करण्यासाठी विद्यार्थीनींनी हा अर्ज भरणे आणि त्यांच्या करिअर उद्देशाबाबत सांगणे आवश्यक आहे.

ही स्कॉलरशिप निर्भयाचे (दिल्ली बलात्कार पीडित) दु:खद निधन झालेल्या दिवसाचे स्मरण म्हणून दिली जाते, याच दिवशी (२९ डिसेंबर) इंटर्नशाला आपला वर्धापन दिन साजरा करते. आयसीएसजीच्या माध्यमातून इंटर्नशाला विषम स्थितींविरूद्ध लढणाऱ्या आणि अडचणींवर मात करत आपले करिअर जोपासणाऱ्या मुलींना मदत करण्यामध्ये यशस्‍वी ठरली आहे.


Back to top button
Don`t copy text!