कोविड 19 चाचण्यांमध्ये भारताने नवा उच्चांक कायम राखला सलग दुसऱ्या दिवशी 11.70 लाखांहून अधिक नमुन्यांची चाचणी


 जास्तीत जास्त चाचण्या करूनही पॉझिटीव्हिटीचा दर 7.5 % हून कमी आहे तर एकूण पॉसिटीव्हिटीचा दर 8.5% पेक्षा कमी आहे

स्थैर्य, सातारा, दि.४: प्रतिदिन 10 लाखांहून अधिक कोविड चाचण्यांचे ध्येय यशस्वीरित्या साध्य केल्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी कोविड 19 चाचण्यांमध्ये भारताने नवा उच्चांक कायम राखला आहे.

सलग दुसऱ्या दिवशी देशभरात11.70 लाख नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे. गेल्या 24 तासात 11,69,765 नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे.

इतर कुठल्याही देशाने प्रतिदिन इतक्या मोठ्या प्रमाणात चाचण्या केलेल्या नाहीत.

इतक्या मोठ्या प्रमाणावर चाचण्या केल्यामुळे आतापर्यंत केलेल्या चाचण्यांची एकूण संख्या 4.7 कोटी इतकी झाली आहे. आतापर्यंत झालेल्या एकूण चाचण्यांची संख्या 4,66,79,145 इतकी झाली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर चाचण्या होऊन देखील प्रतिदिन पॉझिटीव्हिटीचा दर 7.5% हून कमी आहे तर एकूण पॉसिटीव्हिटीचा दर 8.5 % हून कमी आहे.

Description: WhatsApp Image 2020-09-04 at 10.35.11 AM.jpeg

केंद्र सरकारच्या टेस्ट, ट्रॅक, ट्रिट या धोरणाची बहुतेक राज्य/केंद्रशासित प्रदेशात यशस्वी अंमलबजावणी केल्यामुळे हा परिणाम दिसून येत आहे. मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या चाचण्यांमुळे रुग्णांमध्ये असलेली लक्षणे लवकर लक्षात येणे, तातडीने अलगीकरण, आणि वेळेवर उपचार सहज होत आहेत. गृह विलगिकरण आणि रुग्णालयात प्रमाणित उपचार नियमनावर आधारीत उपचार यावर लक्ष ठेवले जात असल्यामुळे मृत्युदर कमी होत आहे. 1 टक्क्यांहून कमी मृत्युदर हे लक्ष्य गाठताना सध्या चा मृत्यूदर 1.74 टक्के इतका असून त्यात घट होत आहे.

देशभरातील चाचणी प्रयोगशाळेच्या जाळ्यांमधील तितक्याच वेगवान विस्तारामुळे चाचणीतील ही वाढ देखील शक्य झाली आहे. भारतात आज 1631 प्रयोगशाळा देशभरात आहेत, 1025 प्रयोगशाळा या सरकारी क्षेत्रात आणि 606 खासगी प्रयोगशाळा आहेत. यातील समाविष्ट होणाऱ्यांमध्ये :

रिअल टाइम रॅपिड टेस्ट पीसीआर आधारित चाचणी प्रयोगशाळा 827 : (शासकीय : 465 + खासगी : 362)

ट्रू नॅट आधारित चाचणी प्रयोगशाळा : 683 (शासकीय : 526 + खासगी : 157)

सीबीएनएएटी आधारित चाचणी प्रयोगशाळा 121 : (शासकीय : 34 + खासगी 87)

कोविड-19 संदर्भात कुठलीही अधिकृत आणि ताजी आकडेवारी/माहिती हवी असल्यास, तसेच काही मार्गदर्शक तत्वे अथवा सूचना बघायच्या असल्यास, कृपया खालील संकेतस्थळाला भेट द्यावी : https://www.mohfw.gov.in/ आणि @MoHFW_INDIA.

तांत्रिक गोष्टींच्या माहितीसाठी संपर्क साधायचा असल्यास, या ईमेल आय डी वर साधावा: technicalquery.covid19@gov.in आणि इतर शंका/समस्यांसाठी ईमेल आयडी- ncov2019@gov.in

कोविड19 संदर्भात इतर माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक (हेल्पलाईन): +91-11-23978046 किंवा 1075 (Toll-free). सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाईन्सची यादी सोबत जोडली आहे.https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf 



प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!