तामिळनाडूमध्ये दुर्घटना:​​​​​​​कुड्डालोर येथील फटाक्यांच्या फॅक्ट्रीमध्ये स्फोट, 9 लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त, स्फोटाने पूर्ण इमारत कोसळली


 

स्थैर्य, सातारा, दि.४: तामिळनाडूच्या कुड्डालोर जिल्ह्यामध्ये एका फटाक्यांच्या फॅक्ट्रीमध्ये स्फोट झाल्याचे वृत्त आहे. या दुर्घटनेत 9 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर चार लोक जखमी झाले आहेत. स्थानिक प्रशासनानुसार, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. ही फॅक्ट्री कट्टुमन्नारकोइल शहरात आहे. चेन्नईपासून हे 190 किमी अंतरावर आहे. या दुर्घटनेचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

तीन किमीपर्यंत गेला आवाज


मीडिया रिपोर्ट्सनुसार, फॅक्ट्रीमध्ये झालेल्या स्फोटाचा आवाज तीन किमीपर्यंत ऐकायला गेला. अनेक लोक घाबरुन घरातून बाहेर आले. स्फोटामुळे फॅक्ट्रीचे प्रचंड नुकसान झाले आहे आणि संपूर्ण बिल्डिंग कोसळली आहे. मृतांमध्ये कारखान्याच्या मालकाचाही समावेश आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!