दैनिक स्थैर्य । दि. १३ जून २०२३ । मुंबई । फिनटेक कंपनी एंजल वन लिमिटेडने मे २०२३ साठी त्यांच्या व्यावसायिक कामगिरीची घोषणा केली. नाविन्यता व ग्राहक समाधानाप्रती स्थिर कटिबद्धतेसह एंजल वनने आपल्या ग्राहकवर्गामध्ये उल्लेखनीय वार्षिक ४४.५ टक्क्यांची वाढ केली, जेथे ग्राहकांची संख्या ०.४६ दशलक्ष ग्राहकांच्या संपादनासह १४.५९ दशलक्षपर्यंत वाढली. एंजल वनने आपल्या युनिक म्युच्युअल फंड एसआयपी नोंदणींमध्ये वाढ केली, जी वार्षिक ६८२.२ टक्क्यांच्या वाढीसह १२२.०७ हजार राहिली. कंपनीची सरासरी दैनंदिन उलाढाल २२.०४ ट्रिलियन रूपये राहिली, ज्यामध्ये वार्षिक १४६.४ टक्क्यांची वाढ झाली आणि रिटेल मार्केट शेअर वार्षिक ४०२ बीपीएससह २३.९ टक्क्यांनी वाढला.
कंपनीच्या अत्याधुनिक आर्थिक सोल्यूशन्स आणि एकसंधी युजर अनुभव देण्याप्रती अविरत कटिबद्धतेने या विकासाला गती दिली. मे २०२३ मध्ये एंजल वनचे सरासरी क्लायंट फंडिंग बुक १०.५७ बिलियन रूपये राहिले. कंपनीने वार्षिक २८.३ टक्क्यांच्या वाढीसह ९०.६० दशलक्ष ऑर्डर्सची नोंद केली, ज्यामुळे ४.१२ दशलक्ष सरासरी दैनंदिन ऑर्डर्सची नोंद झाली, ज्यामध्ये वार्षिक २२.४ टक्क्यांची वाढ झाली.
एंजल वन लि.चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. दिनेश ठक्कर म्हणाले, ‘‘आमचे तंत्रज्ञान-केंद्रित नाविन्यपूर्ण सोल्यूशन्स एंजल वनसोबत अधिकाधिक वैयक्तिक सहयोगी त्यांच्या आर्थिक उत्तम स्थितीसाठी यशाला दाखवतात. युनिक मासिक म्युच्युअल फंड एसआयपी नोंदणींमधील वाढीमधून आमच्या यशस्वी सुपर अॅप धोरणाची प्रगती दिसून येते. आम्ही द्वितीय, तृतीय व त्यापलीकडील श्रेणीच्या शहरांमधील अधिकाधिक ग्राहकांना ऑनबोर्ड करण्यास आणि त्यांना त्यांची आर्थिक ध्येये संपादित करण्यासाठी योग्य गुंतवणूक निर्णय घेण्यामध्ये सक्षम करण्यास उत्साहित आहोत.’’
एंजल वन लि.चे चीफ ग्रोथ ऑफिसर श्री. प्रभाकर तिवारी म्हणाले, ‘‘मे २०२३ मध्ये दिसण्यात आलेल्या अपवादात्मक विकास गतीमधून एंजल वनची नाविन्यता आणि ग्राहक समाधानाप्रती अविरत कटिबद्धतेची क्षमता दिसून येते. आमच्या ग्राहकवर्गामध्ये या उल्लेखनीय वाढीसह आम्ही आघाडीची फिनटेक कंपनी म्हणून आमची उपस्थिती अधिक दृढ केली आहे. या उल्लेखनीय कामगिरीमधून सर्वोत्तमतेप्रती आमचा प्रयत्न आणि आमच्या बहुमूल्य ग्राहकांना नाविन्यपूर्ण संपत्ती-निर्माण सोल्यूशन्स प्रदान करण्याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते.’’