गेल्या 24 तासात जिल्ह्यात सरासरी 31.56 मि.मी. पाऊस


 

स्थैर्य, सातारा, दि. 15 : जिल्ह्यात शनिवारी सकाळी 8 वाजेपर्यंत एकूण सरासरी  31.56 मि.मी. पाऊस झाला आहे.

जिल्ह्यात सकाळी 8 वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती आणि कंसात आतापर्यंत  झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे आहे.  सातारा 40.60  (641.27) मि. मी.,  जावली – 69.33 (1074.89) मि.मी.,  पाटण – 46.55 (984.18) मि.मी.,  कराड – 22.62 (451.69) मि.मी.,  कोरेगाव – 22.56 (415.38) मि.मी.,  खटाव – 9.96 (350.02)  मि.मी.  माण – 5.14(296.71) मि.मी.,  फलटण – 2.89 (283.51) मि.मी.,  खंडाळा – 10.20 (350.90)  मि.मी.,  वाई –25.57 मि.मी.,   महाबळेश्वर – 147.10 (3584.28)  याप्रमाणे आज एकूण 402.51 मि.मी. पावसाची  नोंद झाली आहे.

जिल्ह्यातील प्रमुख धरणांची पाणी पातळी

कोयना धरणात आज 80.76 टी. एम.सी. उपयुक्त पाणीसाठा असून त्यांची टक्केवारी 80.66 इतकी आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात आज सकाळी 8 वाजेपर्यंत कोयना येथे 136 नवजा येथे 82   व महाबळेश्वर येथे  156  मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

सातारा जिल्ह्यातील इतर प्रमुख धरणातील उपयुक्त पाणीपातळी टी.एम.सी.मध्ये व टक्केवारी कंसात पुढील प्रमाणे. धोम – 8.39 (71.79, धोम-बलकवडी- 3.58 (90.39), कण्हेर – 8.45 (88.05), उरमोडी – 9.16 (94.87), तारळी- 4.85 (86.03), निरा-देवघर 7.80 (66.55), भाटघर-18.67 (79.43), वीर – 9.29 (98.81).


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!