ताथवडा घाटात गाडी अडवून पिकअपसह एकूण ६ लाख २७ हजार रुपयांचा माल चोरीला


 

स्थैर्य, फलटण, दि.१९ : फलटण पुसेगाव रस्त्यावर ताथवडा ता. फलटण गावच्या हद्दीतील ताथवडा घाटात गाडी अडवून पिकअपसह एकूण सहा लाख २७ हजार रुपयांचा माल चोरुन नेला आहे. या प्रकरणी चार आज्ञातांविरोधात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

सौ. मुक्ताबाई ढगे यांचे निधन

या बाबत मिळालेली माहिती अशी की, बुधवार दिनांक १८ रोजी सकाळी सहाच्या सुमारास अक्षय भगवान निर्मल रा. निढळ ता. खटाव हे फलटणकडे येत होते. ताथवडा घाटात त्यांचा एका दुचाकी स्वाराने पाठलाग केला. ते ताथवडा घाटातील शेवटच्या वळणावर आले असता तेथे त्यांच्या पिकअप समोर तीन जणांनी आकाशी रंगाची मारुती कार आडवी लावली. या नंतर पिकमध्ये क्लीनर बाजूने चढून निर्मल यांना धक्काबुक्की केली. त्यांच्या खिशातील रोख रक्कम व पाच लाख रुपये किंमतीची एम एच ११ सी एच ७७७५ क्रमांकाची महेंद्रा कंपनीची प्याक बॉडी पिकअप, एक लाख ३ हजार ५०० रुपये किमतीचे प्रत्येकी २० पुडे असलेली गायछाप तंबाखूची १५ पोती, प्रत्येकी ५० नारळ असलेली २५ नारळाची पोती, तीन हजार रुपये किमतीचा मोबाईल व दोन हजार रुपये रोख असा एकुण सहा लाख २७ हजार २५० किमतीचा चोरुन नेला. या घटनेची फिर्याद अक्षय निर्मल यांनी दिली आहे. पुढील तपास ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक यु एस शेख हे करीत आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!