पिंपरी-चिंचवडमध्ये ज्येष्ठ नगरसेवक दत्ता साने यांचे करोनाने निधन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, पुणे, दि. ०४ : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक दत्ता साने यांचे करोनामुळे निधन झाले आहे. ते ५४ वर्षांचे होते. भोसरीतील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. साने यांच्या निधनामुळं राष्ट्रवादीला धक्का बसला आहे.

लॉकडाऊनच्या काळात गरजूंना मदत करण्यासाठी व प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी दत्ता साने हे सातत्यानं कार्यरत होते. याच दरम्यान त्यांना करोनाची लागण झाली होती. करोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर २५ जून रोजी साने यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांना श्वास घेण्याचाही त्रास होत होता. तिथं गेले अनेक दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारांना यश आलं नाही. त्यांनी आज पहाटे अखेरचा श्वास घेतला. साने यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेत विरोधी पक्षनेते पदही भूषवले होते.

हे देखील वाचा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
कॉपी करू नका..!