फलटण तालुक्यात २४ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी १०८ तर सदस्य पदासाठी ७३६ अर्ज दाखल


दैनिक स्थैर्य । दि. ०४ डिसेंबर २०२२ । फलटण । फलटण तालुक्यातील २४ ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. यामध्ये एकूण २४ ग्रामपंचायतीसाठी थेट सरपंच पदासाठी १०८ तर २३८ सदस्य पदासाठी ७३६ अर्ज दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी समीर यादव यांनी दिली.

फलटण तालुक्यातील थेट सरपंच पदासाठी दाखल झालेल्या अर्जांची माहिती पुढील प्रमाणे – बरड १२, वडले ८, सोमंथळी ६, चौधरवाडी ७ , कुरवली खु. ५, ताथवडा २, मठाचीवाडी ४, झडकबाईचीवाडी १, वेळोशी २, मानेवाडी १, गिरवी ८, तरडफ १, पिंप्रद ५, विडणी ५, वाठार निंबाळकर ४, दुधेबावी ९, आदर्की खु. ३, आदर्की बु. १, सुरवडी ८, पाडेगाव ७, सालपे १२, मिरेवाडी कु. १, चव्हाणवाडी २, कुसुर २

तर सदस्यपदासाठी दाखल झालेल्या अर्जांची माहिती पुढील प्रमाणे – बरड ४२, वडले ३३, सोमंथळी २५, चौधरवाडी २३, कुरवली खु. १९, ताथवडा १७, मठाचीवाडी १९, झडकबाईचीवाडी २, वेळोशी १२, मानेवाडी ७, गिरवी ५४, तरडफ १२, पिंप्रद ४०, विडणी ३७, वाठार निंबाळकर ४५, दुधेबावी ३०, आदर्की खु. १८, आदर्की बु. २, सुरवडी ३९, पाडेगाव ३७, सालपे १३, मिरेवाडी कु. ६, चव्हाणवाडी ११, कुसुर १२

सोमवार दि. ५ डिसेंबर रोजी सकाळी ११ पासून दाखल सर्व उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. बुधवार दि. ७ डिसेंबर रोजी दुपारी ३ पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्यात येणार असून दुपारी ३ नंतर निवडणूक चिन्ह वाटप आणि निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल.

रविवार दि. १८ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत संबंधीत ग्रामपंचायत मतदान केंद्रावर मतदान घेण्यात येणार असून मंगळवार दि. २० डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता नवीन शासकीय धान्य गोदाम, फलटण येथे सर्व २४ ग्रामपंचायत मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे.


Back to top button
Don`t copy text!