फलटणच्या श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय संघात नावलौकिक

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. ०४ डिसेंबर २०२२ । फलटण । श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि महाविद्यालय, फलटण येथील खेळाडू विद्यार्थ्यांचे महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीच्या संघात निवड झाली. २४ वी महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धा सन २०२२-२३ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद या ठिकाणी संपन्न होणार आहे. या आंतर विद्यापीठीय क्रीडा स्पर्धेसाठी महाविद्यालयातील कुमारी घंटे दर्शना व कुमारी शिंदे साक्षी यांची आंतर विद्यापीठीय बास्केटबॉल क्रीडा स्पर्धा, कुमारी पिसाळ वैष्णवी, कुमार पाटील राजवर्धन, कुमार पाटील भुषण या विद्यार्थ्यांची आंतर विद्यापीठीय हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा आणि कुमार मदने महेश या विद्यार्थ्याची आंतर विद्यापीठीय क्रीडा स्पर्धेतील राज्यस्तरीय संघात स्थान मिळवून महाविद्यालयाचा नावलौकिक वाढविला. सदरील क्रीडा स्पर्धेसाठी प्रशिक्षक व मार्गदर्शक म्हणून क्रीडा विभागाचे सहायक प्राध्यापक श्री. प्रशांत सावंत लाभले.

महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धेसाठी श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय, फलटण व कृषि महाविद्यालय, फलटण येथील विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय संघात निवड झाल्याबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, फलटण एज्युकेशन सोसायटी गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र राज्य खो – खो असोसिएशनचे अध्यक्ष व फलटण एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, गव्हर्निंग कौंसिलचे सभासद सदस्य, फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी अरविंद निकम, अधिक्षक श्रीकांत फडतरे, प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे, क्रीडा विभागाचे प्राध्यपक श्री. प्रशांत सावंत यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!