राजे गटाच्या पुढार्‍यात हिम्मत असेल तर त्यांनी बोलावे : अशोकराव जाधव; भुरट्या कार्यकर्त्यांवर बोलणार नाही


दैनिक स्थैर्य | दि. 08 जुलै 2024 | फलटण | गत पंचवीस वर्षांपासून मी फलटण शहराच्या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये कार्यरत आहे. पंचवीस वर्षे काम करीत असताना राजे गटाच्या प्रमुख पुढार्‍यांना तालुका ओळखतो त्यांच्यामध्ये जर हिम्मत असेल तर त्यांनी समोर येऊन बोलावे. भुरट्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियांवर मी बोलणार नाही; असे मत फलटण नगर परिषदेचे माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांनी व्यक्त केले.

याबाबत अधिक माहिती अशी की नुकतीच राजे गटाचे कट्टर समर्थक प्रीतसिंह खानविलकर यांनी अशोकराव जाधव यांच्या विरोधात प्रसिद्धीपत्रक दिले होते. त्याबाबत बोलताना अशोकराव जाधव बोलत होते.

राजे गटातील पुढाऱ्यांनी भुरट्या कार्यकर्त्यांच्या नावे प्रसिद्धी पत्रक लिहिण्याच्या ऐवजी ज्यांनी 25 वर्षे राजकारणामध्ये काम केले आहे; प्रमुख पुढार्‍यांनी समोर बोलावे. ज्यांनी प्रसिद्धीपत्रक लिहिले आहे; त्यांना संपूर्ण माहिती सुद्धा नाही. भुयारी गटारी योजनेचे सब टेंडर हे माझ्या मुलाच्या नावे नसून माझ्याच नावे आहे; असेही यावेळी अशोकराव जाधव यांनी स्पष्ट केले आहे.

यावेळी अधिक बोलताना अशोकराव जाधव म्हणाले की; जेव्हा मी दारूचा नाद केला होता तेव्हा तो तेवढ्या शानमध्येच केला होता. दुसऱ्याने लिहून दिलेल्या प्रसिद्धी पत्रकावर स्वतःचे नाव टाकून प्रसिद्धी देण्याच्या ऐवजी आपली पात्रता ओळखूनच बोलावे. माझा जर संयम संपला तर फलटण शहरातील प्रतिष्ठित असलेल्या खानविलकर कुटुंबीयांच्या विरोधात मला सुद्धा बोलता येऊ शकते.


Back to top button
Don`t copy text!