फलटणच्या गणेश शिंदेची भुकरमापक पदी निवड


दैनिक स्थैर्य | दि. 07 जुलै 2024 | फलटण | स्वामी विवेकानंद नगर फलटण येथील गणेश बाबासाहेब शिंदे याची सरळ सेवा भरतीने भूमी अभिलेख अंतर्गत मुंबई विभागामध्ये भुकरमापक म्हणून निवड करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की; गणेश शिंदे यांनी कोणत्याही ठिकाणी अभ्यासिकेमध्ये किंवा इतर क्लासेस न लावता स्वअध्ययन करीत भुकरमापक पद पटकावले आहे. याबाबतची परीक्षा ही नोव्हेंबर 2022 मध्ये घेण्यात आली होती.

गणेश शिंदे यांच्या निवडीने शिंदे कुटुंबीयांसह परिसरातील नागरिकांनी त्यास शुभेच्छा दिल्या आहेत.


Back to top button
Don`t copy text!