बारामती कला क्रीडा फौंडेशन च्या वतीने दत्तक योजना मधील विद्यार्थ्यांचा सन्मान


दैनिक स्थैर्य । दि. १४ मार्च २०२२ । बारामती । बारामती कला क्रीडा फौउंडेशन आयोजित कराटे कलर बेल्ट परीक्षेमध्ये बारामती शहर व ग्रामीण भागामधिल एकूण 60 विद्यार्थी बसले होते त्यामध्ये आर्थिक दृष्टया कमकवूत ,होतकरू, हुशार विद्यार्थ्यांना दत्तक योजने अंतर्गत त्यांच्या कराटे व क्रीडा क्षेत्रातील गुणांना वाव मिळावा म्हणून दत्तक योजना जाहीर करण्यात आली होती.

फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर दिलीप लोंढे ,सचिव चंद्रकांत सावंत ,उपाध्यक्ष अँड, संदीप गुजर संचालक सचिन सावंत व सर्व संचालक मंडळ तसेच चेअरमन शतोकान कराटे किकबॉक्सिंग मार्शल आर्ट असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे शितल शहा यांच्या मार्गदर्शनाने सहकार्याने या सर्व विद्यार्थ्यांचा खर्च फाउंडेशन ने केला.

भारती अशोक कुचेकर ,समीक्षा अशोक झगडे, सेजल नवनाथ जाधव ,साक्षी राजू जाधव ,सरस्वती नितेश माने एकूण फाउंडेशन मध्ये 30 विद्यार्थ्यांना दत्तक घेण्यात आले होते व त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले त्यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
मास्टर दीपक मोरे गणेश घुले आकाश किर्ते योगेश भोसले आदित्य शिरसागर यांनी प्रशिक्षक म्हणून काम पाहिले.


Back to top button
Don`t copy text!