
दैनिक स्थैर्य । दि. २९ नोव्हेंबर २०२२ । फलटण । फलटण तालुक्यातील हनुमंतवाडी येथील तुकोबाराय वारकरी शिक्षण संस्था येथे शिक्षण घेणाऱ्या वंचित, उपेक्षित, गरीब असलेल्या चिमुकल्यांना एक हात मदतीचा या उपक्रमांतर्गत गोखळी ग्रामस्थ व आर्ट ऑफ लिव्हिंग टिम भोरवाडी (ता. भोर) यांच्या माध्यमातून पुस्तके, टेबल, कपाट व खुर्च्या स्नेहभेट म्हणून देण्यात आल्या.
संस्थेचे चालक ह. भ. प. कुंभार महाराज यांनी भेटवस्तूंचा स्वीकार करुन या संस्थेस मदत केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमास पै. बजरंग गावडे, तानाजी गावडे, ह.भ.प. अशोक महाराज घाडगे, श्रीराम बझारचे संचालक मारुती गावडे, मनोज गावडे (तात्या), नंदुमामा गावडे, त्रिंबक बाराते, बापूराव धुमाळ, पै. दिपक चव्हाण, अमोल रोकडे, अमोल हरीहर, उचाळे मामा यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते.
सदर कार्यक्रमासाठी प्रसाद जाधव यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या उपक्रमासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष सागर गावडे पाटील, रमेश दादा गावडे, पप्पू रोकडे, रुपेश गावडे यांच्यासह युवकांचे सुद्धा सहकार्य लाभले.