वसुंधरा वाहिनीची राज्यात हॅटट्रिक


दैनिक स्थैर्य । ११ मार्च २०२३ । बारामती । विद्या प्रतिष्ठान संचलित वसुंधरा वाहिनी, महाराष्ट्रातील कम्युनिटी रेडिओं मध्ये सलग तिसऱ्यांदा विजयी झाली आहे. युनिसेफ आणि सेंटर फॉर सोशल अँड बिहेविअर चेंज कम्युनिकेशन यांच्या वतीने मागील तीन वर्षांपासून महाराष्ट्रातील कम्युनिटी रेडिओ साठी स्पर्धात्मक कार्यक्रम घेण्यात येतात. समुदायाचा आवाजच्या या तीनही वर्षी वसुंधरा वाहिनी राज्यात विजेती ठरली आहे. या कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्रातील २४ रेडिओ केंद्र सहभागी झाले होते. यामध्ये वसुंधरा वाहिनीला द्वितीय क्रमांकाने ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. या वर्षी महिला सबलीकरण हा विषय घेऊन बालविवाह, लिंग समानता, पितृसत्ता, लैंगिक अत्याचार, या विषयांवरील कार्यक्रमांची मालिका वसुंधरा वाहिनीवरून प्रसारित करण्यात आली.

महाराष्ट्रातील सर्व कम्युनिटी रेडिओंच्या कार्यक्रमांच परीक्षण करून पारितोषिक वितरण समारंभ सोमवार दिनांक २० फेब्रुवारी रोजी ऑनलाईन करण्यात आला. सेंटर फॉर सोशल अँड बिहेविअर चेंज कम्युनिकेशनचे व्यवस्थापकीय संचालक मा.निशीत कुमार, युनिसेफ़ महाराष्ट्राच्या बाल संरक्षण विशेषज्ञा मा.अल्पा वोरा, युनिसेफ़ महाराष्ट्राच्या सामाजिक आणि वर्तवणूक बदल विशेषज्ञा मा. सोनाली मुखर्जी, युनिसेफ़ महाराष्ट्राच्या बाल संरक्षण सल्लागार मा. डॉ.सरिता संकरण, SBC3 कार्यक्रम समन्वयक दिना संम्युअल आणि महराष्ट्रातील २३ कम्युनिटी रेडिओचे प्रतिनिधी कार्यक्रमास उपस्थित होते.

विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्त सौ. सुनेत्रा अजित पवार, उपाध्यक्ष अॅडव्होकेट अशोक प्रभुणे, संस्थेच्या सचिव अॅडव्होकेट नीलिमा गुजर, खजिनदार श्री युगेन्द्र पवार, विश्वस्त डॉ. राजीव शहा, किरण गुजर, मंदार सिकची, रजिस्ट्रार श्रीश कंबोज, विश्वस्त मंडळ, तसेच व्ही.आय.आय.टी.चे डायरेक्टर डॉ. आनंद देशमुख, प्रशासकीय अधिकारी संजय जगताप यांनी प्रोत्साहन दिले.

महिलां सबलीकरणासाठी रेडिओ कार्यक्रम आणि सामुदायिक कार्यक्रमांमुळे सोशल अँड बिहेवीअरल चेंज करण्यास वसुंधरा वाहिनी सहाय्यक ठरत असल्याचे वसुंधरा वाहिनीच्या केंद्र प्रमुख सौ.आशा मोरे यांनी सांगितले

आर.जे. स्नेहल कदम यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमामध्ये अभिजित खोत, वैष्णवी बोरकर, अक्षय कांबळे, यांनी सहभाग घेतला. लेखन रवींद्र गडकर यांनी केले.


Back to top button
Don`t copy text!