कटफळच्या विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिकांसह कृतीयुक्त सहभागातून शिकवले वैज्ञानिक प्रयोग


दैनिक स्थैर्य । ११ मार्च २०२३ । बारामती । कटफळ (ता:बारामती) येथील झैनबिया इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये स्टुडंट्स लीड कॉन्फरन्स व विज्ञान प्रदर्शन आयोजित केले होते. यामध्ये गणित, इंग्रजी, विज्ञान विभाग या विषयावर सादरीकरण केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी विविध फन विथ सायन्स ऍक्टिव्हिटी, टाकाऊ वस्तु पासून विविध उपकरणे, शैक्षणिक साहित्य, खेळणे, अभ्यासक्रमातील प्रात्यक्षिकांसह अभ्यासक्रमाव्यतिरिक्त वैज्ञानिक प्रयोग, रसायन, जीव व भौतिक शास्त्रातील प्रात्यक्षिके इत्यादी. प्रयोग उभारून विद्यार्थ्यांच्या कृतीयुक्त सहभागाने शिकविण्यात आले.

या कार्यक्रमाचे उद्घाटन एम.आय.डी.सी अग्निशामक दलाचे श्री.सुनील इंगवले व आदी. मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सहभागी विद्यार्थ्यांना संस्थेतील सर्व विषयाच्या शिक्षकांचे सहकार्य मिळाले. तसेच कार्यक्रमाचे आयोजन संस्थेच्या प्राचार्या इन्सिया नासिकवाला यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडले. विज्ञान प्रदर्शनाचे प्रयोग पाहून पालक वर्ग, नागरिक, आजी-माजी विद्यार्थी भारावून गेले.


Back to top button
Don`t copy text!