
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा

स्थैर्य, शिर्डी, दि. ०४ : लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथील साईबाबा मंदिरात दरवर्षी गुरुपौर्णिमेनिमित्त मोठा सोहळा असतो. मात्र, यंदा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन, गुरुपौर्णिमा रद्द करण्यात आली आहे.
शिर्डीतील गुरुपौर्णिमा सोहळा रद्द करण्याचं पत्र नगरचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांना दिलं.
सोहळा रद्द करण्यासह साईदर्शनालाही बंदी घालण्यात आली आहे.
दरवर्षी लाखो भाविक गुरुपौर्णिमेच्या दिवशी साईदर्शनासाठी शिर्डीत दाखल होत असतात. राज्यभरातून पालख्याही शिर्डीत येतात. मात्र, सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे चित्र पाहायला मिळणार नाही.
