
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य | दि. ६ जुलै २०२४ | फलटण |
फलटण येथे शुक्रवारी विभागीय आयुक्त पुणे चंद्रकांत पुलकुंडवार यांनी प्रांत कार्यालयात ‘लाडकी बहिण’ या अभियानाबाबत मार्गदर्शन केले. यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी तालुक्याचे वतीने त्यांचे स्वागत केले व लाडकी बहिण अभियान हे तालुक्यात प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावा, एकही महिला भगिनी यापासून वंचित राहू नये, कार्यकर्त्यांनी घरोघरी जावे, असे म्हटले.
यावेळी फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले, तहसीलदार अभिजित जाधव, जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, युवा नेते धनंजय साळुंखे पाटील, रणजितसिंह भोसले, विधानसभा प्रमुख सचिन कांबळे पाटील, मंडल अध्यक्ष बजरंग गावडे, अमोल सस्ते, जालिंदर सस्ते व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
