कंटेन्मेट झेान निलम नगरला पालकमंत्री भरणे यांची भेट (पहा VDO)


स्थैर्य, सोलापूर दि. 3 : पालकमंत्री भरणे यांनी कंटेन्मेट झेान निलम नगर येथील ना्गरिकांशी संवाद साधुन त्यांच्या समस्या जाणुन घेतल्या तसेच कंटेन्मेट झेान मधील नागरिकांच्या आरोग्याची विचारपुस केली.

तसेच त्या भागात कोविड सर्व्हे झाला आहे का,  सर्व्हे मध्ये काय-काय विचारण्यात आले होते. तपासणी केली का याची विचारपूस केली. शासनाकडून कोणती अडचण आहे का हे जाणुन घेतले. नागरिकांनी  वृध्दाची 

माणसांची आणि लहान मुलांची काळजी घ्या, कोरोनाला घाबरु नका कोरोनाशी आपण लढू शकतो आणि हारवूया असा संवाद साधला.

निलम नगर येथील स्थानिक डॉक्टर व नगरसेवक यांच्याशी चर्चा केली.  नागरिकांशी संवाद साधत असताना शासकीय नियमाचे पालक करावे, तसेच आरोग्याची योग्य काळजी घ्यावी असे आवाहन पालकमंत्री भरणे यांनी केले. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि पालिका आयुक्त पी. शिवशंकर होते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!