
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
![]() |
| स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन अभिवादन केल्यानंतर प्रतिमेसमवेत बी.एम.मोदी, सचिन सुर्यवंशी बेडके व अन्य मान्यवर. |
स्थैर्य, फलटण, दि.२५ : श्रीराम एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंतराव चव्हाण हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात भारताचे माजी उपपंतप्रधान व महाराष्ट्राचे भाग्यविधाते स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या 36 व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले.
संस्थेचे उपाध्यक्ष बी. एम. मोदी, सचिव सचिन सुर्यवंशी बेडके, लायन्स क्लबचे रणजित निंबाळकर, लायनेस क्लबच्या सौ. उज्वला निंबाळकर यांच्यासह संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य, विविध शाखांचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक/शिक्षिका उपस्थित होते.

