दैनिक स्थैर्य | दि. ८ डिसेंबर २०२३ | फलटण |
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, सामाजिक समतेचे महानायक, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त व क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या ४७ व्या पुण्यतिथी निमित्त बुधवारी सरडे गावात विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला.
राजगृह युवा सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने या अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी विविध मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतीकारी कार्याला उजाळा दिला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व क्रांतीसिंह नाना पाटील हायस्कुल आणि राजगृह युवा सामाजिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले प्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक डॉ. प्रभाकर पवार सर मुधोजी महाविद्यालय फलटण आणि स्कूल कमिटीचे चेअरमन श्री. बेलदार गुरूजी हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.