दैनिक स्थैर्य । दि. ०१ ऑगस्ट २०२३ । नवी दिल्ली । साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या १०३ व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय येथे अभिवादन करण्यात आले.
कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात शिर्डी मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी प्रभारी निवासी आयुक्त श्रीमती नीवा जैन, सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांच्यासह उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
महाराष्ट्र परिचय केंद्रात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन
महाराष्ट्र परिचय केंद्रात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रभारी उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा यांच्यासह उपस्थित कर्मचाऱ्यांनीही त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.