
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. २० फेब्रुवारी २०२२ । फलटण । रयतेचे राजे, स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार व अभिवादन करून विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे कामकाज सुरू करण्यात आले.
यावेळी मुधोजी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. एच. कदम, मुधोजी महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. पी. आर. पवार यांनी जयंती मंडळास शुभेच्छा दिलेल्या आहेत. माजी नगरसेवक मधुकर काकडे, विजय येवले यांच्यासह जयंती मंडळातील सदस्य उपस्थित होते.
