फलटण मार्केट यार्डात कांद्याला तेजीत भाव; ३१०० रुपयांचा उच्चांक

फलटण बाजार समितीत कांद्याला ३१०० रुपयांचा उच्चांकी दर मिळाला आहे. तनमन ट्रेडिंग कंपनीत सर्वाधिक दराची नोंद झाली असून यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

स्थैर्य, फलटण, दि. 08 जुलै : फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजारात मंगळवारी कांद्याचे दर तेजीत असल्याचे पाहायला मिळाले. येथील मार्केट यार्डात कांद्याला प्रतिक्विंटल कमाल ३१०० रुपयांचा उच्चांकी दर मिळाला असून, मे. तनमन ट्रेडिंग कंपनीच्या अडतीवर या सर्वाधिक दराची नोंद झाली आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

३३४२ पिशव्यांची आवक

बाजार समितीने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, मंगळवारी फलटण मुख्य बाजारात कांद्याची मोठी आवक झाली. एकूण १६७१ क्विंटल म्हणजेच ३३४२ पिशव्या कांदा विक्रीसाठी दाखल झाला होता. बाजारात सध्या कांद्याला चांगला उठाव आणि मागणी असल्याने दरामध्ये तेजी पाहायला मिळत आहे.

कांद्याचे सविस्तर बाजारभाव

मार्केट यार्डात कांद्याला किमान ८०० रुपये, तर कमाल ३१०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. तसेच सरासरी २००० रुपये प्रतिक्विंटल दराने कांद्याची खरेदी-विक्री झाली. मे. तनमन ट्रेडिंग कंपनीकडे कांद्याला मिळालेल्या या उच्चांकी दरामुळे शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Back to top button
Don`t copy text!