रणजितदादांच्या नेतृत्वात विश्वराज राजेजीराव नाईक निंबाळकरांचा भाजपात प्रवेश

फलटणमधील विश्वराज राजेजीराव नाईक निंबाळकर यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. अभिजित नाईक निंबाळकर व किरण जाधव उपस्थित होते.

स्थैर्य, फलटण, दि. ८ जुलै : फलटण शहरातील विश्वराज राजेजीराव नाईक निंबाळकर यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. आगामी काळातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश स्थानिक पातळीवर महत्त्वाचा मानला जात आहे.

या जाहीर पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजित नाईक निंबाळकर, सुरेंद्रसिंह नाईक निंबाळकर, जयदीप निकम, कोळकीचे युवा नेते किरण जाधव व बाळासाहेब रिटे यांची प्रमुख उपस्थिती होती. यासोबतच शहरातील आणि परिसरातील इतर विविध मान्यवर व कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावली.

माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक स्थानिक युवक आणि कार्यकर्ते भाजपात सहभागी होत आहेत. विश्वराज राजेजीराव नाईक निंबाळकर यांच्या पक्षप्रवेशामुळे फलटण शहर तसेच ग्रामीण भागातील भाजपाच्या पक्ष बांधणीला आणि संघटनेला आणखी बळ मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Back to top button
Don`t copy text!