शिक्षकांकडून भावी पिढी घडविण्याचे महान कार्य – महेंद्र सूर्यवंशी (बेडके)

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. ८ सप्टेंबर २०२४ | फलटण |
भारत देशाचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा केला जातो, असे सांगून शिक्षकांचे भावी पिढी घडवण्यात फार मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन महेंद्र सूर्यवंशी (बेडके) यांनी केले.

‘शिक्षक दिना’निमित्त जेएसजी संगिनी फोरम, फलटणमार्फत ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार’प्राप्त श्रीराम एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत मालोजीराजे प्राथमिक विद्यामंदिर येथे शिक्षकांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात अध्यक्षपदावरून महेंद्र (सूर्यवंशी) बेडके बोलत होते.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार अरविंदभाई मेहता, श्री चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिराचे विश्वस्त व फलटणमधील प्रसिद्ध व्यापारी राजेंद्र कोठारी, जैन सोशल ग्रुपचे उपाध्यक्ष श्रीपाल जैन, तसेच संगिनी फोरम अध्यक्षा सौ. अपर्णा जैन, उपाध्यक्षा सौ. मनीषा व्होरा, सचिव सौ. प्रज्ञा दोशी, खजिनदार सौ. मनीषा घडिया, सहसचिव नीता दोशी, माजी सचिव दीप्ती राजवैद्य, पौर्णिमा शहा, संगिनी सदस्या सारिका दोशी, जयश्री उपाध्ये, संध्या महाजन, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. कल्पना बेडके व शिक्षिका व शिक्षकवृंद उपस्थित होते.

प्रास्ताविकात संगिनी अध्यक्षा सौ. अपर्णा जैन यांनी शिक्षक दिनानिमित्त उपस्थित शिक्षकांना शुभेच्छा देऊन आपल्या जीवनात शिक्षकांचे फार मोठे योगदान आहे, असे सांगून संगिनी फोरमच्या विविध उपक्रमांबद्दल आढावा घेतला.

प्रारंभी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. कल्पना बेडके, उपशिक्षिका सौ. जया देसाई, सौ. ज्योती खरात, उपशिक्षक नागेश्वर सोनवलकर, सोनाई बालक मंदिरच्या मुख्याध्यापिका साधना सतीश महामुनी, उपशिक्षिका अश्विनी चौधरी यांचा तसेच संगिनी सहसचिव नीता दोशी यांचा सन्मानचिन्ह व श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

सूत्रसंचालन दीप्ती राजवैद्य यांनी केले. आभार प्रदर्शन मनीषा घडिया यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी (बेडके) व प्रमुख पाहुणे यांचा संगिनी फोरममार्फत शाल, श्रीफळ व मोत्यांची माळ देऊन सत्कार करण्यात आला.

प्रशालेतर्फे मान्यवरांचा तसेच संगिनी पदाधिकारी यांचा श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.


Back to top button
Don`t copy text!