गुड थॉट्स : सुप्रभात…..आज २६ फेब्रुवारी… स्वतःवर दृढ विश्वास ठेवा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


एखाद्या अडचणीत देवाने तुमचे लगेच ऐकले की तुमची श्रद्धा वाढते. उशिरा ऐकले की, तुमची सहनशक्ती वाढते. पण ऐकलेच नाही तर.
समजून जा की देवाला ठाऊक आहे. ही अडचण तुमची तुम्हीच सोडवू शकता! स्वतःवर विश्वास ठेवा.खरंच आपला आपल्यावरील विश्वास कमी होत चालला आहे.विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर म्हणतात ,”आत्मविश्वास ही यशाची गुरुकिल्ली आहे.” आपणाला ती सापडत नाही.कारण तुझे आहे तुझंपाशी परी जागा(जाग) चुकलाशी अशी अवस्था झाल्याने आपला विश्वास कमी होत जातो.विश्वास वरील श्रध्दा कमी झाली की अंधश्रद्धा बळवते.

स्वतःवरील विश्वास वाढविण्यासाठी प्रचंड आत्मविश्वास ,दृढ निश्चय ,मनोबल,वाचन,लेखन,सात्त्विक आहार,मनाला मोहित करणारी श्रवणीय व्याख्याने,यशस्वी महापुरुषांचे आदर्श ,प्रचंड अंतरिक ऊर्जा,कार्यावर निष्ठा,ठाम भूमिका,तत्त्वाशी बांधिलकी,स्थिरता,सहनशीलता,विनम्रता,सौजन्यशीलपणा याबरोबरच सर्वांच्या बरोबरीने जाण्याची वृत्ती बाळगल्यास स्व वरील विश्वास वाढतो.

स्वतःवरील विश्वास गमवला की मन व शरीर दुबळे बनते.ते नको त्या गोष्टींचा आधार घेऊन चालण्याचा प्रयत्न करते.पण शेवटी ते कोसळते.ऊन वारा वादळ पाऊस त्सुनामी अस्मानी सुलतानी संकटे आली तर आत्मविश्वासच्या बळावर आपण यशस्वीपणे वाटचाल करणारच यात तीळमात्र शंका नाही.

आत्मविश्वास कमवा जीवन आनंदानं जगा

आपलाच आत्मविश्वासू प्रा.रवींद्र कोकरे – ग्रामीण कथाकार,

श्रीमती प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, फलटण.
९४२१२१६८२१


Back to top button
Don`t copy text!