शरीरापेक्षा मनाचा थकवा खूप त्रासदायक असतो .शरीर थकले की शांत झोप लागते पण मन थकले की झोप उडते.
आधुनिक काळात बदलत्या जीवनशैलीने,वाढत्या अपेक्षेने ,अवाजवी तुलनेने,पैशाच्या हव्यासाने,व्यसनाधिनता,परनिंदा,स्पर्धात्मक धावण्याने,अयोग्य शारीरिक सवयीने,खरे पणाची कास सोडून खोट्या प्रतिष्ठेच्या मुखावटेची बरोबरी करणे,अवैद्य मार्गाने संपत्ती संचय करणे,वर्तमान काळात न जगता भविष्य काळाची चिंता इत्यादी कारणांमुळे मानसिक तणाव वाढत आहे.
अलिकडे शारीरिक आजरापेक्षा मानसिक रूग्ण संख्या वाढत आहे.सगळे असून झोप येत नाही.एखदा डुलका झाला की दचकून जागे झाल्यावर झोपेचे खोबरे होतय. झोपेच्या गोळ्या सगळ्यात जास्त खपणे हे आपल्या भारतीय आयुर्वेद व संस्कृतीला भूषणवह नाही.
आपण आपल्या गरजा कमी करणे,समाधानी रहाणे ,मनमोकळे बोलणे,मोजकच पण सकस घरचे खाणे,कमीत कमी सलग सात तास झोपणे,प्राणायाम,योगासने,सायकल चालवणे,शेतात काम करणे,नियमित चालणे ,छंद जोपासणे यामुळे आपोआप मनशांती भेटेल.
मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण
आपलाच मनातला प्रा.रवींद्र कोकरे – ग्रामीण कथाकार,
श्रीमती प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, फलटण.
९४२१२१६८२१