जेव्हा वेदना आणि कुचकं बोलणं दोन्ही सहन व्हायला लागलं की समजायचं आपण जगायला शिकलो. जीवन जगताना सतत क्षणोक्षणी ठेचा,वेदना,अवहेलना,अपमान,विरोध,नाचकी सहन करुन सहनशीलता वाढविल्यास जीवन उन्नत होणार.आपल्या शारीरिक ताकदी बरोबरच मानसिक संतुलन वाढीस लागावी.
अलिकडेच्या काळात बोलता बोलता सहज जाणिवपूर्वक कुचकं बोलणं व ऐकणं सुरु आहे.त्यामुळे मानसिक संतुलन ज्याच्या त्याच्या मानसिकतेवर घडते(बिघडते).
आपण कुचकं बोलण्यापेक्षा नेमके,योग्य ,अचूक,परखड बोलणे केव्हाही हितवाह आहे. कुचकं बोलायला फार काही कौशल्ये लागतात असे नाही.मात्र वेदनेवरील संवेदना जागृत करण्यास कुचकं बोलून नव्हे.तर समजून उमजून मोजून मापून तोलून बोलणे योग्यच.
तरुणाईला समजून घेण्यात व समजून सांगण्यात ज्याच्याकडे समजूतदारपणा नक्कीच ती तरुणाई वाया जाणार नाही.सूज्ञ पालक ,माता, गुरुजन यांनी माथा भडकल असे कुचकं न बोलता व न तुलना करता पाल्याच्या मनात आत्मविश्वास चेतवला तर उद्याचे भवितव्य उज्जवलमय आहे. पाल्याच्या कमकुवत पणाचे भाडवंल न करता त्याच्यातील चांगल्या गुणांना वाव व संधी दिल्यास संवेदना जागृती होऊन वेदनारहित कार्य सुरु राहिल.सकारात्मकता,जबाबदारपणा,जाणिवा यांची जाणिव करुन दिल्यास कोणत्याच गोष्टींची उणीव भासणार नाही.ठरलं तर मग कुचकं बोल बोलून आपल्या वाणीला अपवित्र करण्या पेक्षा समोरील व्यक्ती मध्ये आपल्या बोलण्याने संवेदना जागी झाल्यास पुण्य पदरी पडले म्हणून समजा.
वेद समजणे सोपे पण वेदना समजणे कठीण आहे
आपलाच संवेदक प्रा.रवींद्र कोकरे – ग्रामीण कथाकार,
श्रीमती प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, फलटण.
९४२१२१६८२१