पाचगणीतील वाल्मिकीनगर येथे गादीच्या गोडाऊनला आग


दैनिक स्थैर्य । दि.१५ फेब्रुवारी २०२१ । पाचगणी । वाल्मिकीनगर पाचगणी (ता. महाबळेश्वर) येथील गादीच्या गोडाऊनला आज दुपारी दीडच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या आगीच्या घटनेत गादी तयार करण्याचे सुमारे साडेतीन ते चार लाखांचे साहित्य जळून खाक झाले. पाचगणी पालिकेचा बंब व पालिका कर्मचाऱ्यांनी ही आग आटोक्यात आणली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

पाचगणी येथील वाल्मिकीनगर येथे मंदिराशेजारी उत्तर प्रदेश येथील कामगारांनी पत्र्याचे शेड भाड्याने घेऊन गादी बनविण्याचे काम करत होते. या शेडला सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास आग लागली. याबाबत सिकंदर बागवान व अमिन चौधरी यांनी पाचगणी अग्निशमन नियंत्रण कक्षाला खबर दिली. त्यानंतर पालिका कर्मचारी व अग्निशमन बंब तात्काळ घटनास्थळी दाखल झाला. गादीचा फोम व प्लास्टिक माल असल्याने काही क्षणातच आगीने मोठ्या प्रमाणात पेट घेतला. पालिकेचे कर्मचारी सुर्यकांत कासुर्डे, जगदिश बगाडे, आबू डांगे, बाबुराव झाडे, सागर बगाडे व स्थानिक युवकांनी दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले.


Back to top button
Don`t copy text!