कुशल मनुष्यबळ निर्मितीतून रोजगार देणारा कौशल्य, उद्योजकता विभाग

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मनुष्यबळाचे कौशल्य विकसित करून त्यांना मागणी असलेल्या क्षेत्रात रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणे. त्याद्वारे परिवार व समाजाचा एक उत्पादक सदस्य म्हणून सन्मानाने भावी आयुष्य समर्थपणे घडविता यावे. विविध विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचे एकात्मिक नियोजन व अंमलबाजवणीतून कुशल महाराष्ट्र–रोजगार युक्त महाराष्ट्र ध्येय समोर ठेवून उद्योजकांना कुशल मनुष्यबळ पुरवूनराज्याच्या अर्थव्यवस्थेचे बळकटीकरण करण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग कार्यरत आहे .

धोरण : जिल्ह्यातील रोजगार व स्वयंरोजगाराच्या मागणीनुसार कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन कुशल मनुष्यबळ निर्माण करणे तसेच युवकांच्या नावीन्यपूर्ण नवसंकल्पनांना वाव देण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करणे.   

विभागाची उद्दिष्टे :- कौशल्य विकास प्रशिक्षणाद्वारे उमेदवारांना रोजगार व स्वयंरोजगारक्षम बनवणे. युवकांना त्यांच्या नावीन्यपूर्ण संकल्पांनाना वाव देऊन व्यासपीठ उपलब्ध करून देणे. उद्योजकांशी समन्वय साधून त्यांची नोंदणी करणे व त्यांच्या मागणीनुसार प्रशिक्षित कुशल उमेदवार पुरवणे. बेरोजगार उमेदवारांची नोंदणी करणे व त्यांना नोकरी मिळविण्यासाठी मार्गदर्शन व सहाय्य करणे तसेच व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन करणे.

बेरोजगार उमेदवार नाव नोंदणी व रोजगार मार्गदर्शन :विभागाच्या पोर्टल वरुन उमेदवारांना ऑनलाइन नाव नोंदणीनोंदणीचे नूतनीकरणपात्रतेत वाढपत्ता बदल इत्यादि करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. उद्योजकांना रिक्त पदे अधिसूचित करणेविवरण पत्र भरणे इ. सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेत. 

विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजना :-

कौशल्यविकासयोजना :केंद्र व महाराष्ट्र शासनाद्वारे राज्यात विविध क्षेत्रात कौशल्य प्रदान करून उमेदवारांना रोजगार व स्वयंरोजगारक्षम बनविण्यासाठी व महाराष्ट्र राज्यात कौशल्य विकास सोसायटी मार्फत नियोजनसमन्वयअंमलबजावणी आणि देखरेख करण्यासाठी विभागामार्फत विविध योजना राबविल्या जातात. त्यामध्ये प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना (PMKVY)केंद्र पुरस्कृत राज्य व्यवस्थापित, NULM National Urban Livelihood Mission, प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान – PMKUVA, किमान कौशल्य विकास कार्यक्रम (जिल्हा नियोजन समिती निधीतून), पूर्व कौशल्य ज्ञान मान्यता (RPL)SANKALP –  Skill Acquisition and knowledge Awareness Livelihood Promotion

नाविन्यता :महाराष्ट्रात अनुकूल व्यावसायिक वातावरण निर्मिती करून नवकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे. स्टार्ट अप्सना सक्षम करण्यासाठी आर्थिक व इतर अनुषांगिक सहाय्य करणे. विविध सुविधा उपलब्ध करून स्टार्टअप्स ईकोसिस्टीमला विकसित करणे. नवीन व जागतिक दर्जाचे इनक्यूबेटर्स स्थापित करणे. महाराष्ट्र व्हर्च्युअल इनक्यूबेटर्सचा विकास करणे.  व्यवसाय योजना स्पर्धेसारख्या जिल्हास्तरीय कार्यक्रमांचे आयोजन करणे.कार्यशाळा व इतर संवादाद्वारे या धोरणाबद्दल जिल्ह्यांमध्ये जनजागृती करणे.

रोजगार मेळावे :ही योजना नियोक्ते आणि नोकरी शोधणाऱ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे. उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि कोणत्याही शुल्काशिवाय नियोक्त्याला योग्य उमेदवार उपलब्ध करून देण्यासाठी नियोक्ता आणि नोकरी शोधणाऱ्यांना एकाच छताखाली आमंत्रित करणे.मनुष्यबळाच्या आवश्यकतेनुसार विविध आस्थापना/नियोक्ते/नियुक्ती करणाऱ्यांना एकाच ठिकाणी कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून  देते. नोकरी शोधणाऱ्यांना जागेवरच रोजगार मिळतो आणि नियोक्त्याला या रोजगार मेळावामध्ये योग्य मनुष्यबळ लगेच मिळते

रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम –  Employment Promotion Programme (E.P.P.) – रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम (EPP) ही खाजगी क्षेत्रातील आस्थापना/उद्योगांमध्ये नोकरी शोधणाऱ्यांना त्यांची कौशल्ये सुधारण्यासाठी आणि त्यांना रोजगारक्षम बनवण्यासाठी On job Training  देण्याची योजना आहे.ही योजना नोकरी शोधणाऱ्यांसाठी सुरू करण्यात आली. ही योजना सामान्यतः ईपीपी‘ म्हणून ओळखली जाते. या प्रशिक्षणासाठी किमान १० वी  उत्तीर्ण आणि १८ वर्षे व त्यावरील वयाचे उमेदवार पात्र  आहेत.प्रशिक्षण कालावधी सहा महिने असतो.प्रशिक्षणादरम्यान उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार मासिक स्टायपेंड मिळतो.

मॉडेलकरिअरसेंटर – जिल्ह्यातील रोजगार इच्छुक उमेदवारांना रोजगाराच्या संधीतंत्रज्ञानाचा वापर करुन उमेदवारांना व्यवसाय मार्गदर्शन, समुपदेशन आणि प्रशिक्षण उपलब्ध करुन देणे.उमेदवारांची मूल्यमापन चाचणी (वर्तणूकमानसशास्त्रीयकौशल्यकल इ. चाचणी) घेणेसमुपदेशन करुन रोजगार/ स्वयंरोजगार उपलब्ध करुन देणेबाबत सहाय्य करणे. तज्ञ व्यक्तींमर्फत व्यवसाय मार्गदर्शन केले जाते.

उद्योजकताबाबतयोजना :राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या विकासासाठी राज्य शासनाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना केली आहे.त्यामार्फत स्वयंरोजगार इच्छुक उमेदवारांना स्वयंरोजगाराबाबतची माहितीमार्गदर्शनव आर्थिक सहाय्य केले जाते.

जिल्हा माहिती कार्यालय

सातारा


Back to top button
Don`t copy text!