सातार्‍यात २१ व २२ मे रोजी महारोजगार मेळावा


दैनिक स्थैर्य | दि. १९ मे २०२३ | फलटण |
महाराष्ट्र शासनाच्या वतीने सातारा जिल्ह्यातील सर्व सुशिक्षित १८ ते ३० वयोगटातील तरुण-तरुणींना नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्याकरीता महारोजगार मेळावा दि. २१ मे व २२ मे २०२३ रोजी यशोदा टेक्निकल कॅम्पस वाढे, सातारा आयोजित करण्यात आला आहे. फलटण शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व सुशिक्षित बेरोजगारांनी या संधीचा लाभ उठवावा, असे आवाहन फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी केले आहे.

पोनि शंकर पाटील यांनी महारोजगार मेळाव्याबाबत माहिती देऊन रोजगार करण्यास इच्छुक युवक व युवतींना http://satarajobfair2023.in या लिंकवर नोंदणी करून दिनांक २१/०५/२०२३ व २२/०५/२०२३ रोजी सकाळी ०९.०० ते सायंकाळी ०५.०० या वेळेत यशोदा टेक्निकल कॅम्पस, वाढे, सातारा येथे हजर राहावे, असे आवाहन केले आहे.

फलटण तालुक्यातील जास्तीत जास्त युवक-युवतींनी याचा लाभ घ्यावा व संबंधितांनी आपली माहिती देण्यासाठी फलटण शहर पोलीस ठाणे येथे २० मे २०२३ रोजी सकाळी १०.०० पूर्वी पोलीस शिपाई मुकेश घोरपडे (मोबा. ९०९६१२५२७७) यावर संपर्क साधावा, असे पोनि पाटील यांनी सांगितले आहे.


Back to top button
Don`t copy text!