ADVERTISEMENT
स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • Contact us
  • Privacy Policy
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

प्रवचने – विषयाची व लौकिकाची आस सोडावी

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
May 14, 2022
in इतर, देश विदेश, प्रादेशिक, फलटण, बारामती, लेख, संपादकीय, सातारा जिल्हा

आपण रामाचे झालो म्हणजे आपली काळजी त्याला लागते. आपण रामाचे व्हायला अडचण आमचीच. आवडच मुळी आपण विषयाची आणि लौकिकाची ठेवतो. साहजिकच, एकाची आसक्ति ठेवल्याने दुसर्‍याची विरक्ति येते. नोकरीच्या वेळेस आम्ही बायकामुलांना बाजूला सारून कामावर जातो ना ? मग साधनेच्या वेळी बायकोमुले आड येतात हे कारण का सांगावे ? बायको आणि पैका या दोन गोष्टी आमच्या आड येत असतात; असे आजवर अनेक संतांनी सांगितले. मग या निर्माण तरी का केल्या असे कोणी विचारतील. त्याला उत्तर म्हणजे, काड्याच्या पेटीने विस्तवही पेटविता येतो आणि घरही जाळता येते; त्याचा जसा आपण उपयोग करावा तसा तो होतो. खरे म्हणजे आम्हाला भगवंताची तळमळच लागत नाही. एकजण मला म्हणाला की, “मला प्रपंच टाकावासा वाटतो.” मी त्याला म्हटले, “नुसता प्रपंच टाकण्याने तुला वैराग्य कसे येईल ? वैराग्याला नेहमी विवेकाची जोड लागते. तू आपला मीपणा टाकलास तरी खूप झाले. ”

 

चांगले कर्म आड येत नाही असे थोडेच आहे ? वाईट कर्म कुणाला सांगण्याची तरी आपल्याला लाज वाटते, पण सत्कर्म अभिमानाने ज्याला त्याला सांगत सुटतो. ‘मागील जन्मी पाप केले होते म्हणून या जन्मी हे भोगतो’ असे म्हणतो; आणि ‘आता चांगले कर्मे करतो म्हणजे पुढल्या जन्मी सुख लागेल’ असे म्हणतो. म्हणजे जन्ममरण्याच्या फेर्‍यातून सुटण्याऐवजी त्याच्यात गुंडाळले जाण्यासारखेच झाले ! दुष्कर्मामुळे पश्चात्ताप होऊन एकदा तरी भगवंताची आठवण होईल; परंतु सत्कर्माचा अहंकार चांगल्या माणसालाही कुठे नेऊन सोडील याचा पत्ता लागणार नाही.

राजासुद्धा योग्य मार्ग दाखविण्यासाठी आपल्या संगतीला चांगला माणूस ठेवतो. भगवंताने उद्धवालाही ‘सत्समागम कर’ म्हणून सांगावे, याहून अधिक काय पाहिजे ? कडू कारले खाल्ले तर कडूपणाचीच प्रचीती होते मग विषयाच्या प्राप्तीने जीवन गोड कसे होईल ? ‘प्रेम येईल तेव्हा भगवंताची भक्ति करीन’ असे म्हणू नये. विषयासाठी आपण मरमर काम करतो आणि तेवढे करूनही सुख लाभत नाही’ मग भगवंताचे नाव न घेता, प्रेम येत नाही हे म्हणणे किती वेडेपणाचे आहे ! लग्नाआधी मुलीला दहापाच जणांना दाखविली तरी, लग्न झाल्यावर ज्याप्रमाणे त्यांतला एकच नवरा असतो आणि बाकीच्यांची तिला आठवणही राहात नाही, त्याप्रमाणे, आम्ही एकदा रामाचे झालो, म्हणजे त्याच्याशी लग्न लावले, म्हणजे मग विषयांचे प्रेम कुठे आले?

Related


Previous Post

वाढे तेल डेपोतून ५0 हजाराचे डबे चोरीस

Next Post

शरद पवार यांच्यावर टीका करण्याचा भाजपला नैतिक अधिकार नाही – पद्मश्री लक्ष्मण माने यांची पत्रकार परिषदेत टीका

Next Post

शरद पवार यांच्यावर टीका करण्याचा भाजपला नैतिक अधिकार नाही - पद्मश्री लक्ष्मण माने यांची पत्रकार परिषदेत टीका

ताज्या बातम्या

महापुरुषांना जातीच्या चौकटीत अडकवणे चुकीचे म्हणूनच श्रीमंत संजीवराजेंची अध्यक्षपदाची निवड योग्य : संतोष बिचुकले

May 22, 2022

खेड ग्रामपंचायतीला आता नगरपंचायतीचा दर्जा

May 22, 2022

ओबीसी साठी आरक्षण मिळालेच पाहिजे : माजी आमदार योगेशअण्णा टिळेकर

May 22, 2022

गुणवरे च्या ब्लूम इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये समर कॅम्प चा उत्साहात समारोप

May 22, 2022

सातारा जिल्ह्यातील ४४० ‘उमेद’ समूहांना ७ कोटी कर्ज वाटप

May 22, 2022

देशसेवा करताना जावलीच्या सुपुत्राला वीरमरण

May 22, 2022

सातारा शहरातील ७० ओढ्यांच्या सफाईचे काम पूर्ण; वीस सफाई कामगारांचा टास्क फोर्स सफाई मोहिमेवर

May 22, 2022

प्रवचने – गुरूवर अत्यंत श्रद्धा ठेवावी

May 22, 2022

ऐतिहासिक लाल महालात गाण्याचे चित्रीकरण करणाऱ्यांवर कारवाई करा – खासदार उदयनराजे भोसले यांचा सोशल मीडियावर संताप

May 22, 2022

सिंदखेड राजा विकास आराखडा करताना स्थानिकांचे सहकार्य घ्यावे – उपमुख्यमंत्री अजित पवार

May 21, 2022
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • Contact us
  • Privacy Policy

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!