विडणी: सौ. छायाताई रामदास कोल्हे यांचे निधन – दुपारी अंत्यविधी

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

सिद्धाई क्रेन सर्व्हिसचे संचालक विकास कोल्हे यांच्या मातोश्री छायाताई रामदास कोल्हे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे.

स्थैर्य, विडणी, दि. ३० जुलै : फलटण तालुक्यातील विडणी येथील रहिवासी आणि सिद्धाई क्रेन सर्व्हिसचे संचालक विकास रामदास कोल्हे यांच्या मातोश्री छायाताई रामदास कोल्हे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्या ६२ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती, मुले, सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.

आज दुपारी अंत्यविधी

छायाताई कोल्हे यांच्या पार्थिवावर विडणी (ता. फलटण) येथील कोल्हेमाळा परिसरातील त्यांच्या राहत्या घराशेजारी दुपारी २.०० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच विडणी परिसर आणि फलटण तालुक्यातील विविध क्षेत्रांतील नागरिकांनी शोक व्यक्त केला आहे.

Back to top button
Don`t copy text!