दैनिक स्थैर्य | दि. २ ऑक्टोबर २०२४ | फलटण |
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या सूचनेनुसार व फलटण नगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली, भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष अनुप शहा यांच्या प्रयत्नांतून फलटण शहरात १ ऑक्टोबर २०२४ रोजी नवीन समाज मंदिर येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात नेत्र तपासणी, चष्मा वाटप व मोतीबिंदू ऑपरेशनसाठी मदतीची सेवा देण्यात आली. शिबिराचे प्रमुख पाहुणे म्हणून अॅड. जिजामाला नाईक निंबाळकर आणि फलटण-कोरेगाव विधानसभा प्रमुखसचिन पाटील उपस्थित होते. अॅड. जिजामाला नाईक निंबाळकर यांनी नागरिकांशी संवाद साधून नेत्र आरोग्याचे महत्त्व पटवून दिले. शिबिराच्या अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक सचिन अहिवळे व सुधीर अहिवळे (चेअरमन) होते.
आयोजकांनी शिबिराला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादावर समाधान व्यक्त केले. या कार्यक्रमावेळी श्री. अमरसिंह नाईक निंबाळकर(चेअरमन, स्वराज स.ना.पतसंस्था), श्री. अशोक जाधव (माजी नगरसेवक), श्री. अजय माळवे (माजी नगरसेवक), श्री. महेबूब मेटकरी, सौ. उषा राऊत (भाजपातालुका अध्यक्षा), सौ.शर्मिला रणवरे, सौ. प्रियांका कदम, श्री. महेश जगताप, श्री. सुनिल अहिवळे, श्री. सनी मोरे, श्री. गणेश बिराडे, श्री. जीवन काकडे, अनुसूचित जाती भाजपा शहर उपाध्यक्ष विकी बोके, कामगार संघटना भाजपा शहर उपाध्यक्ष विक्रांत काकडे उपस्थित होते.