दैनिक स्थैर्य | दि. २ ऑक्टोबर २०२४ | फलटण |
‘नेपियर गवत’ हे किफायतशीर शेतीसाठी उत्तम पर्याय आहे, फलटण तालुक्यातील शेतकर्यांनी पशुपालन व्यवसाय किफायतशीर होण्यासाठी चारा उत्पादन व व्यवस्थापन हा एक महत्त्वाचा भाग असल्याने जनावरांच्या दुग्ध उत्पादन वाढीसाठी नेपियर गवतापासून तयार करण्यात येणारे इतर उपउत्पादने, चारा पिक म्हणून तसेच शेतकर्यांनी मुख्य ऊस पिकाचा भार कमी करून नेपियर गवत पिकाचे भरघोस उत्पन्न घ्यावे, असे आवाहन विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी शेतकर्यांना केले.
‘जीवन शक्ती बायोएनर्जी एलएलपी’ आयोजित नेपियर गवत पीक परिसंवाद कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून श्रीमंत रामराजे उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनानंतर दीपप्रज्ज्वलन करून करण्यात आली. प्रास्ताविकात डॉ. एस. डी. निंबाळकर, प्राचार्य, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय, फलटण यांनी उपस्थित शेतकर्यांना नेपियर गवताची ओळख, चारा पीक, नेपियर लागवड पद्धत, नेपियर गवताचे उपयोग या विषयावर प्राथमिक माहिती दिली.
यावेळी तज्ज्ञ मार्गदर्शक डॉ. पी. सी. पटेल, निवृत्त संशोधन शास्त्रज्ञ, आनंद कृषि विद्यापीठ, गुजरात यांनी शेतकर्यांना मार्गदर्शन करताना नेपियर गवताची लागवड पद्धत, हवामान, खत व्यवस्थापन, आंतर मशागत, पाणी व्यवस्थापन, नेपियर गवताची कापणी, नेपियर गवताचा व्यावसायिक उपयोग या विविध विषयांवर उपस्थित शेतकर्यांना सखोल मार्गदर्शन केले.
डॉ. आरोही कुलकर्णी, बायोटेक्नॉलॉजिस्ट, पुणे यांनी नेपियर गवताचा उगम, संकर पद्धत, संकरातून अधिकतम ठोंबे उत्पादन, ठोंबे निवड पद्धत, नेपियर गवताचे फुटवे व्यवस्थापन, नेपियर गवताचे भरघोस उत्पादन पद्धत या विषयांवर उपस्थित शेतकर्यांना मार्गदर्शन केले.
यानंतर शेतकर्यांना नेपियर गवत लागवड संबंधित असणार्या शंकांचे तज्ज्ञांकडून निरसन करण्यात आले. नेपियर गवत लागवड पद्धतीचे पिक प्रात्यक्षिक शेती विभागातील प्रक्षेत्रावर घेण्यात आले.
या कार्यक्रमास श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी, फलटण एज्युकेशन सोसायटी, श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबळकर, सदस्य, मे गव्हर्निंग कौन्सिल, फलटण एज्युकेशन सोसायटी फलटण, श्रीमंत सत्यजितराजे नाईक निंबळकर, सदस्य, मे गव्हर्निंग कौन्सिल, फलटण एज्युकेशन सोसायटी, फलटण, मे गव्हर्निंग कौन्सिल, फलटण एज्युकेशन सोसायटी, फलटणचे सदस्य, श्री. धनंजय पवार, अध्यक्ष, फलटण तालुका सहकारी दुग्धसंघ, श्री. बाळासाहेब शेंडे, चेअरमन, श्रीराम सहकारी कारखाना, फलटण, श्री. भाटे एस. एम, श्री. शितोळे एस. के., श्री. ठोंबरे के. आर., डॉ. यू. डी. चव्हाण, प्राचार्य, कृषि महाविद्यालय, फलटण, प्रा. वेदपाठक सर, प्राचार्य, मालोजीराजे शेती विद्यालय व ज्युनियर कॉलेज, फलटण, शेतकरी, महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.
सूत्रसंचालन सौ. राजश्री शिंदे व आभार डॉ. जी. बी. अडसूळ यांनी मानले.